एक्स्प्लोर

वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, लवकर निकाल, अजित पवारांचा कस्पटेंना शब्द; IPS सुपेकरांनाही इशारा

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांस पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास अटक केली

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagwane) हिच्या लग्नात ज्यांच्या हाताने हगवणे कुटुंबीयांना फॉर्च्युनरची चावी देण्यात आली होती त्या अजित पवारांनी (Ajit pawar) वैष्णवीच्या माहेर जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. वैष्णवीच्या वडिलांसोबत फोनवरुन संवाद साधल्यानंतर अजित पवारांनी आज त्यांच्या घरी (Pune) जाऊन आई-वडिलांची भेट घेत संपूर्ण घटना जाणून घेतली. यावेळी, मोठा पोलीस बंदोबस्त कस्पटे कुटुंबीयांच्या घराबाहेर दिसून आला. पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधत भूमिका व तपासाबाबत माहिती दिली. तसेच, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल, याचा लवकर निकाल लागेल असेही अजित पवारांनी सांगितले. तर, वैष्णवीचे मामासासरे असलेल्या पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनाही अजित पवारांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.  

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांस पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास अटक केली. या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळातही या घटनेवरुन संताप व्यक्त होत असून भाजपच्या महिलांनी कोर्टाबाहेर आंदोलन करत, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आज सकाळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर, माध्यमांशी संवाद साधताना, याप्रकरणी कोणाचीही हयगय केली जाणार नाही, राजकीय हस्तक्षेप होणार नाही असे अजित पवारांनी म्हटले. 

घटनेची माहिती मिळताच, मी पिंपरी चिंचवडचे आयुक्त चोबे यांना आदेश दिले होते. कोणाची हयगय करायची नाही, राजकीय हस्तक्षेप होणार नाही. आरोपींना तातडीनं बेड्या ठोकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, तिघांना आधीचं अटक केली होती, सासरे आणि दिराला आज बेड्या ठोकल्या आहेत. मग मी कस्पटे कुटुंबीयांशी वैयक्तिक बोललो. तपास करणाऱ्या सर्वांना इथंच बोलावलं. तसेच, बाळ ज्यांच्याकडे होते त्या निलेश चव्हाणवर ही कडक कारवाईचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल - अजित पवार

आरोपी फोन आणि गाडी वारंवार बदलत होता, मात्र पोलिसांनी जुळवाजुळव करुन चांगली कारवाई केली. आता न्यायालयात ही त्यांना कठोर शिक्षा होईल, त्याअनुषंगाने पावलं उचलायला सांगिले आहेत. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल, तातडीनं निकाल लागेल. कारण, ही अतिशय वेदनादायक घटना आहे, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.पुणे सीपी अंडर येणाऱ्या एरियातील निलेश चव्हाणकडे बंदूक आहे, त्यालाही कठोर कारवाईचे आदेश पुण्याच्या सीपींना दिले आहेत. त्यानेही घटस्फोट दिल्याचं समजलं आहे, दुसरीकडे मोठी सून मयुरीचा ही छळ केल्याचं समोर आलंय. या सर्वांच्या अनुषंगाने केस स्ट्राँग केली जाईल, असेही पवार म्हणाले.  

जालिंदर सुपेकर यांनाही इशारा

तुमच्या-माझ्या घरातील केस असते तर चव्हाट्यावर ही केस आणली नसती. तपास योग्य सुरुये, असं कस्पटे कुटुंब म्हणाले. प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली जाईल. पत्रकारांना वकीलापेक्षा जास्त ज्ञान आहे, हत्येचा गुन्हा दाखल केला आणि पुरावे नसतील तर केस स्ट्राँग राहणार नाही. त्यामुळे पुराव्यांच्या आधारे हे प्रकरण हाताळले जातंय. शेवटी न्यायालयात प्रकरण टिकायला हवं. जालिंदर सुपेकर यांच्याशी मी बोललो. त्यांना सांगितलं प्रकरण संवेदनशील आहे, तुमच्याबाबत दबक्या आवाजात बोललं जातं. पण, तपासात फोनचे कनेक्शन आढळलं तर कारवाई केली जाईल, असेही अजित पवारांनी सांगितलं.  

हेही वाचा

धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर आचाऱ्याकडून अत्याचार; बंधाऱ्याजवळ चप्पल अन् ओढणी आढळली

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manohar Lal Dhakad : कारमधून उतरून थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर खुलेआम संभोग करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात मोठी कारवाई; 'त्या' महिलेबाबत कोणता निर्णय झाला?
कारमधून उतरून थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर खुलेआम संभोग करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात मोठी कारवाई; 'त्या' महिलेबाबत कोणता निर्णय झाला?
Mumbai Rain Updates: मस्जिद बंदर स्थानकात वॉटरपार्कसारखं पाणी भरताच मध्य रेल्वेने बीएमसीवर खापर फोडलं, म्हणाले...
मस्जिद बंदर स्थानकात वॉटरपार्कसारखं पाणी भरताच मध्य रेल्वेने बीएमसीवर खापर फोडलं, म्हणाले...
पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्करप्रमुख भारताविरोधात रसद पुरवणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला; दोन्ही देश एकमेकांना ट्रेनिंग, गुप्तचर अन् तांत्रिक सहाय्य करणार!
पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्करप्रमुख भारताविरोधात रसद पुरवणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला; दोन्ही देश एकमेकांना ट्रेनिंग, गुप्तचर अन् तांत्रिक सहाय्य करणार!
Sushma Andhare on Rupali Chakankar : चाकणकरांच्या ब्लॅकमेलर गँगकडून फोटो मॉर्फ करून महिलांची बदनामी, सुषमा अंधारेंचा अजितदादांना पत्र धाडत गंभीर आरोप
चाकणकरांच्या ब्लॅकमेलर गँगकडून फोटो मॉर्फ करून महिलांची बदनामी, सुषमा अंधारेंचा अजितदादांना पत्र धाडत गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पाऊस; रेल्वे वाहतूक विस्कळीत, लोकल 30 ते 40 मिनिटे उशिरानेMumbai Monsoon | मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; रेल्वे रुळ पाण्याखाली | लोकल वाहतूक विस्कळीतKEM Hospital Rain : मुंबईतील KEM रुग्णालयात साचलं पाणी, मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटकाJyoti Mete : ...तर वैष्णवीनं आत्महत्या केली नसती! हगवणे प्रकरणावर ज्योती मेटेंचं वक्तव्य ABP MAJHA

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manohar Lal Dhakad : कारमधून उतरून थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर खुलेआम संभोग करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात मोठी कारवाई; 'त्या' महिलेबाबत कोणता निर्णय झाला?
कारमधून उतरून थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर खुलेआम संभोग करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात मोठी कारवाई; 'त्या' महिलेबाबत कोणता निर्णय झाला?
Mumbai Rain Updates: मस्जिद बंदर स्थानकात वॉटरपार्कसारखं पाणी भरताच मध्य रेल्वेने बीएमसीवर खापर फोडलं, म्हणाले...
मस्जिद बंदर स्थानकात वॉटरपार्कसारखं पाणी भरताच मध्य रेल्वेने बीएमसीवर खापर फोडलं, म्हणाले...
पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्करप्रमुख भारताविरोधात रसद पुरवणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला; दोन्ही देश एकमेकांना ट्रेनिंग, गुप्तचर अन् तांत्रिक सहाय्य करणार!
पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्करप्रमुख भारताविरोधात रसद पुरवणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला; दोन्ही देश एकमेकांना ट्रेनिंग, गुप्तचर अन् तांत्रिक सहाय्य करणार!
Sushma Andhare on Rupali Chakankar : चाकणकरांच्या ब्लॅकमेलर गँगकडून फोटो मॉर्फ करून महिलांची बदनामी, सुषमा अंधारेंचा अजितदादांना पत्र धाडत गंभीर आरोप
चाकणकरांच्या ब्लॅकमेलर गँगकडून फोटो मॉर्फ करून महिलांची बदनामी, सुषमा अंधारेंचा अजितदादांना पत्र धाडत गंभीर आरोप
Kolhapur Weather Update : कोल्हापुरात 29 मेपर्यंत यलो आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट; पावसाची संततधार कायम
कोल्हापुरात 29 मेपर्यंत यलो आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट; पावसाची संततधार कायम
Aastad Kale On Vaishnavi Hagawane Death Case: 'वैष्णवीच्या माहेरचेही तेवढेच दोषी...' वैष्णवी हगवणे प्रकरणावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिडला
'वैष्णवीच्या माहेरचेही तेवढेच दोषी...' वैष्णवी हगवणे प्रकरणावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिडला
Sangli News : मिरज एमआयडीसीमध्ये मध्यरात्री एकाला भोसकून संपवलं; आरोपी फरार, परिसरात खळबळ
मिरज एमआयडीसीमध्ये मध्यरात्री एकाला भोसकून संपवलं; आरोपी फरार, परिसरात खळबळ
Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मंत्रालयाबाहेर साचलं गुडघाभर पाणी, पाहा PHOTOS
मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मंत्रालयाबाहेर साचलं गुडघाभर पाणी, पाहा PHOTOS
Embed widget
OSZAR »