Shubhanshu Shukla Axiom-4 Mission अॅक्सियम-4 अंतराळात झेपावलं तो क्षण,शुभांशूसह चौघे अंतराळात
Shubhanshu Shukla Axiom-4 Mission अॅक्सियम-4 अंतराळात झेपावलं तो क्षण,शुभांशूसह चौघे अंतराळात
भारताचे शुभांशू शुक्ला आज इतिहास रचणार आहेत. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन प्रवाशांना घेऊन जाणारे ॲक्सिओम-4 मिशन आज म्हणजेच 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) प्रवासासाठी रवाना होईल. येत्या काही तासांतच ॲक्सिओम मिशन -4 हे फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेटंरमधून उड्डाण करण्यास सज्ज असेल अशी घोषणा नासाने केली आहे.ॲक्सिओम -4 मिशन हे भारतसाठी खूप खास आहे कारण कारण 1984 साली विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर, भारत आता आपला दुसरा अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे स्वप्नातील रॉकेट आज उड्डाण करणार आहे. या मिशनवर जाताना शुभांशू शर्मा हे सोबत काय विशेष गोष्टी नेणार आहेत हे समोर आलं आहे. भारतीय वेळेनुसार, आज थोड्याच वेळात ( दुपारी 12 वाजून 01) मिनिटांनी वाजता हे मिशन लाँच केले जाईल. या मिशनचे नेतृत्व नासाचे माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन करत आहेत. एक्स-4 टीममध्ये पोलंडचे स्लावोज उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचाही समावेश आहे.




