Kolhapur Wedding : खड्ड्यांनी हैराण! कोल्हापुरात चक्क नवरदेवाने रोड रोलरवरुन काढली वरात
Kolhapur Wedding : खड्ड्यांनी हैराण! कोल्हापुरात चक्क नवरदेवाने रोड रोलरवरुन काढली वरात
कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही अस म्हणतात...कोल्हापुरातील एखाद समारंभ असो किंवा आंदोलन...कोल्हापूरकर नेहमी आपलं वेगळेपण दाखवून देतात... सध्या कोल्हापुरात असच एक लग्न चर्चेचा विषय ठरलाय..कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची समस्या आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही. अनेक आंदोलने करून देखील झोपेच सोंग घेतलेल्या महानगरपालिकेला जाग येत नसल्याने पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणाने आपल्या लग्नाची वरात चक्क रोड रोलर आणि बॉयलरवर काढली आहे...संकेत जोशी आणि सोनाली नायक यांचा विवाह सोहळा पार पडला...मात्र शहरातील समस्यावर पारंपारिक लेझीम हलगी घुमके आणि सनईच्या तालावर ही अनोखी वरात काढण्यात आली...ही अनोखी वरात सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरला आहे...
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 18 May 2025
भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार, १२ मे रोजी ठरल्याप्रमाणे शस्त्रसंधी कायम राहणार, भारतीय लष्कराची निवेदन प्रसिद्ध करुन माहिती
ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी सात शिष्टमंडळांची घोषणा...५९ सदस्यांची यादी जाहीर...५१ खासदार, नेते आणि आठ राजदुतांचा समावेश
इंडिया आघाडीतील सदस्यांनी शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार घालायला हवा, खासदार संजय राऊत वक्तव्य... घाईघाईने शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नसल्याचंही मत





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
