Pahalgam Attack | पहलगामचा कट लष्कर ए तोयबाच्या पाच कमांडर्सनी रचल्याची माहिती
Pahalgam Attack | पहलगामचा कट लष्कर ए तोयबाच्या पाच कमांडर्सनी रचल्याची माहिती
पहलगाम हल्ल्याबाबत एसआयएसह विविध तपास यंत्रणांच्या हाती लागलेली माहिती पाकिस्तानचा बुरखा टराटर फाडणारी आहे... हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचला गेला. पाकव्याप्त काश्मिरात मीरपूर आणि रावळकोट या दोन शहरात हा कट रचला गेला अशी माहिती उघड झालीय. लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख सैफुल्ला कसुरीच्या आदेशाने ५ कमांडर्सनी हा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. अबू मुसा, इदसीर शाहीन, मोहम्मद नवाझ, अब्दुल रफा रसूल आणि अब्दुल्ला खालिद अशी या दहशतवाद्यांची नावं आहे. फेब्रुवारी महिन्यात हल्ल्याचा कट रचला. ११ मार्चला मीरपूर इथे या पाच दहशतवाद्यांची सैफुल्लासह बैठक झाली. त्यानंतर खम्बल इथल्या मार्चच्या अखेरीस झालेल्या बैठकीत २२ एप्रिलचा दिवस आणि पहलगाम हे ठिकाण निवडण्यात आलं.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
