Gilgit Protest Against Pakistan | पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने, गिलगिटमध्ये पाकविरोधात घोषणा
Gilgit Protest Against Pakistan | पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने, गिलगिटमध्ये पाकविरोधात घोषणा
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने गिलगिटमध्ये पाकविरोधात हजारो स्थानिकांच्या घोषणा पहलगाम हल्ल्यानंतर पाकविरोधात असंतोष
पाकिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची सैन्यांवर अत्यंत क्रूर पद्धतीने बलोच बंडखोरांकडून हल्ले सुरू आहेत. कधी रेल्वे हायजॅक, तर कधी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला अशा पद्धतीने बलूच लिबरेशन आर्मीकडून सातत्याने पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केलं जात आहे. यामध्ये अनेक सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. ही भयावह स्थिती असतानाच आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा असंतोष उफाळून आला आहे. हजारो नागरिक पाकिस्तान सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याकडून पाकिस्तान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अत्यंत कमालीचे ताणले गेले आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
