Special Report Rajendr Hagwane : हागवणे प्रकरणात सुपेकरांवर गंभीर आरोप, सातारा ते कर्नाटकपर्यंत पळापळ
Special Report Rajendr Hagwane : हागवणे प्रकरणात सुपेकरांवर गंभीर आरोप, सातारा ते कर्नाटकपर्यंत पळापळ
वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane Death) आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बंदूकधारी निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्वेनगर परिसरातील रहिवासी निलेश चव्हाण याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कस्पटे कुटुंबीय जेव्हा वैष्णवीच्या मुलाला घेण्यासाठी गेले तेव्हा निलेश चव्हाणनं बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. तर निलेश चव्हाणचे भाऊ रामचंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आम्ही त्याला मदत करणार नाही.
रामचंद्र चव्हाण यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, काल पाच सहा पोलीस रात्री आले होते. निलेश बावधनला गेला, तिकडून आला नाही, आमच्यासोबत काही बोलणं झालं नाही. तो आमच्या संपर्कात नाही. निलेशकडे बंदूक आहे लायसन्स देखील आहे. त्याच्याआधी प्रकाश हगवणे यांची मुलगी आणि भावजय बाळाला घेऊन आले होते. बाळ एक रात्र घरी राहिलं. दुसऱ्या दिवशी कस्पटे आणि हगवणे काका आले होते. बहिरट आले होते. निलेशचं मत होतं की, तुम्ही चला पोलीस स्टेशनला मी येतो, बाळ देतो, लिहून देतो. आम्हाला नकोय ते म्हणाले आम्ही असं नाही करणार. आमचं हगवणे कुटुंबाशी नातं नाही. आमचं हगवणेंशी काही संबंध नाही. फोन केला, दोन दिवस बाळ राहू दे. आता अटक झाली तर घरचे सहकार्य करणार नाहीत. त्याला माहिती नाही, म्हणून तो पळत आहे. पण पळून चालत नाही, असंही त्याने म्हटलं आहे.
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
