PSL: पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की, UAE चा PSL चे सामने खेळवण्यास नकार, भारताच्या IPL साठी 'या' देशाच्या पायघड्या
UAE Big Action on Pakistan: संयुक्त अरब अमिरातनं पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. यूएईनं पाकिस्तान सुपर लीगचे सामने दुबईत खेळवण्यास नकार दिला आहे.

UAE Declined To Host PSL दुबई:पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली आहे. संयुक्त अरब अमिरातनं पाकिस्तान सुपर लीगचे सामने दुबईत आयोजित करण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पीएसएलचे उर्वरित सामने दुबईत होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, ता यूएईनं पाकिस्तान सुपर लीगचे सामने आयोजित करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे भारतानं सध्या आयपीएलचे सामने एका आठवड्यासाठी स्थगित केले असले तरी त्याच्या आयोजनासाठी बीसीसीआयला इंग्लंड क्रिकेट बोर्डानं प्रस्ताव दिला आहे.
भारतात ज्या प्रमाणं इंडियन प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं. त्याप्रमाणं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून पीएसएल म्हणजे पाकिस्तान सुपर लीगचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेतील केवळ 8 सामने बाकी राहिले आहेत. 8 मे रोजी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ हल्ल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पीएसएलनं 8 मे रोजीचा सामना रद्द केला आहे. रावळपिडींत कराची किंग्ज आणि पेशावर जाल्मी यांच्यात लढत होणार होती.मात्र, ती रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पीएसएलचे उर्वरित सामने दुबईत आयोजित करण्याचं जाहीर केलं होतं.
यूएईकडून पाकिस्तानचा अपमान
संयुक्त अरब अमिरातकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला तोंडावर पाडण्यात आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं संयुक्त अरब अमिरातची परवानगी न घेता किंवा त्यांना न कळवता पीएसएलचे सामने दुबईत घेण्याची घोषणा केली असावी. आता यूएईनं सामने त्यांच्या देशात आयोजित करण्यास नकार दिला आहे. त्यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पीएसएलचे उर्वरित सामने कुठं होणार ते पाहावं लागेल.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान आमने सामने आले आहेत. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाक व्याप्त जम्मू काश्मीरमधील एकूण 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांच्याकडून ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. भारताकडून ते ड्रोन पाडले जात आहेत.
दरम्यान, भारतानं देखील आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित केलं आहे. नवं वेळापत्रक नंतर जाहीर केलं जाणार आहे. या दरम्यान इंग्लंडनं आयपीएलच्या राहिलेल्या सामन्यांचं आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला आहे. जगभरातील विविध देशांनी भारतासोबत उभं राहत पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये, असं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
