एक्स्प्लोर

Vaishnavi Hagawane Death: वैष्णवीचा नवरा शशांक अन् सासू लता यांच्या अडचणी वाढणार? हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन जप्त, तपासाला वेग

Vaishnavi Hagawane Death: म्हाळुंगे पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यानंतर सुशील आणि लता हगवणेंना दुपारी 3 वाजता खेड न्यायालयात हजर केलं जाणार आहेत म्हणजे करिष्मा वगळता आज सर्वांनाच न्यायालयाची पायरी चढावी लागणार आहे.

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पती शशांक आणि सासू लता हगवणेंना (Vaishnavi Hagawane Death) आज म्हाळुंगे पोलीस अटक करणार आहेत, अशी माहिती आहे. वैष्णवीची (Vaishnavi Hagawane Death)सासू आणि नवरा सध्या येरवडा कारागृहात असून सकाळी 10:30च्या दरम्यान या दोघांचा पोलीस घेणार आहेत. जेसीबी व्यवहारात प्रकाश येळवंडे यांची 11 लाख 70 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई होत आहे. तर दुसरीकडे वैष्णवी मृत्यूप्रकरणात हगवणे बाप-लेकाची आणि बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेशची पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळं राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाणला आज पुणे सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. मात्र, हगवणे बाप-लेक आणि निलेशची स्वतंत्र सुनावणी पार पडेल. तसेच म्हाळुंगे पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यानंतर सुशील आणि लता हगवणेंना दुपारी 3 वाजता खेड न्यायालयात हजर केलं जाणार आहेत म्हणजे करिष्मा वगळता आज सर्वांनाच न्यायालयाची पायरी चढावी लागणार आहे. त्यामुळं आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी हगवणे माय-लेकावरती जेसीबी मशीनच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे जेसीबी मशीन जप्त केले. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कारागृहातून त्यांचा ताबा घेण्यासाठी या प्रकरणात म्हाळुंगे पोलीसांकडून प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे.

प्रशांत अविनाश येळवंडे (33, रा. निघोजे, ता. खेड) यांनी 29 मे रोजी महाळुंगे यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे (दोघे रा. भुकूम, ता. मुळशी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लता हगवणे हिच्या नावावर असलेले जेसीबी मशीन प्रशांत येळवंडे यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. जेसीबीच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा 50 हजारांची रक्कम येळवंडे हे शशांकला देत होते. मात्र, त्याने हप्ते न भरता रिकव्हरी एजंटला हाताशी धरून जेसीबी मशीन येळवंडे यांच्याकडून काढून स्वतःच्या ताब्यात घेतले. येळवंडे हे संबंधित रक्कम किंवा मशीनची मागणी करण्यासाठी गेले. त्या वेळी शशांकने पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात येळवंडे यांना 11 लाख 70 हजार रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या अटकेसाठी म्हाळुंगे पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंट जारी केले आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुह्याच्या तपासासाठी शशांक आणि लता यांना ताब्यात देण्यात यावे, असा अर्ज महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयाकडे सादर केला आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्षभर खास खुराक, तेल मालिश- खरारा अन् प्रशिक्षण, धवलसिंह माेहिते पाटलांचा 'बलराज' घोडा पालखी सोहळ्यासाठी देहूला निघाला
वर्षभर खास खुराक, तेल मालिश- खरारा अन् प्रशिक्षण, धवलसिंह माेहिते पाटलांचा 'बलराज' घोडा पालखी सोहळ्यासाठी देहूला निघाला
आषाढीच्या रिंगण सोहळ्यात धावणारा 'बलराज' अश्व निघाला; 40 वर्षांपासून सेवा, मोहिते पाटलांना मान
आषाढीच्या रिंगण सोहळ्यात धावणारा 'बलराज' अश्व निघाला; 40 वर्षांपासून सेवा, मोहिते पाटलांना मान
Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ
सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ
Sharad Pawar and Ajit Pawar: शरद पवार म्हणाले, भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेणार नाही, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शरद पवार म्हणाले, भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेणार नाही, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar Full Speech : भाजपसह गेलेले संधीसाधू, आता सोबत घेणार नाही, पवारांचं वक्तव्य ABP MAJHASharad Pawar : भाजपसह गेलेल्यांना सोबत घेणार नाही, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य ABP MAJHAJaykumar Gore Speech :  सहकार कारखाना ते सोलापूर-गोवाफ्लाईट, जयकुमार गोरेंनी सगळं काढलंSanjay Raut PC : सुनील शेळकेंनी धमक्या देऊ नये..आज तुमची सत्ता, उद्या आमची असेल!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्षभर खास खुराक, तेल मालिश- खरारा अन् प्रशिक्षण, धवलसिंह माेहिते पाटलांचा 'बलराज' घोडा पालखी सोहळ्यासाठी देहूला निघाला
वर्षभर खास खुराक, तेल मालिश- खरारा अन् प्रशिक्षण, धवलसिंह माेहिते पाटलांचा 'बलराज' घोडा पालखी सोहळ्यासाठी देहूला निघाला
आषाढीच्या रिंगण सोहळ्यात धावणारा 'बलराज' अश्व निघाला; 40 वर्षांपासून सेवा, मोहिते पाटलांना मान
आषाढीच्या रिंगण सोहळ्यात धावणारा 'बलराज' अश्व निघाला; 40 वर्षांपासून सेवा, मोहिते पाटलांना मान
Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ
सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ
Sharad Pawar and Ajit Pawar: शरद पवार म्हणाले, भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेणार नाही, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शरद पवार म्हणाले, भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेणार नाही, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
वारी पंढरीची... आषाढीसाठी रेल्वेकडून 80 विशेष गाड्या; कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांसाठीही ट्रेन
वारी पंढरीची... आषाढीसाठी रेल्वेकडून 80 विशेष गाड्या; कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांसाठीही ट्रेन
काँग्रेस नात्यागोत्याचा पक्ष झालाय, पक्ष नेतृत्वहीन आहे; अशोक चव्हाणांची टीका, सांगितलं राज'कारण'
काँग्रेस नात्यागोत्याचा पक्ष झालाय, पक्ष नेतृत्वहीन आहे; अशोक चव्हाणांची टीका, सांगितलं राज'कारण'
Jalgaon Crime: जळगाव हादरले! 13 वर्षीय मुलाला गळा चिरून संपवलं, मृतदेह शेतात फेकून दिला, नरबळीच्या संशयानं गावकऱ्यांमध्ये दहशत
जळगाव हादरले! 13 वर्षीय मुलाला गळा चिरून संपवलं, मृतदेह शेतात फेकून दिला, नरबळीच्या संशयानं गावकऱ्यांमध्ये दहशत
Emergency Landing at Nagpur Airport: नागपूरमध्ये इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, बॉम्ब ठेवल्याचा फोन, एअरपोर्टवर एकच पळापळ
नागपूरमध्ये इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, बॉम्ब ठेवल्याचा फोन, एअरपोर्टवर एकच पळापळ
Embed widget
OSZAR »