Mumbai Aqua Metro : सर आली धावून, मेट्रो स्टेशन गेलं वाहून Special Report
मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या मेट्रो-३चं बरंच कौतुक झालं. पण अॅक्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेट्रो लाईनवर पहिल्याच पावसात अतिशय वाईट परिस्थिती पाहायला मिळाली.
त्यामुळे मुंबई मेट्रो-३ च्या निकृष्ट कामाचं पितळ उघडं पडलंय. कुठे तलावाचं स्वरुप तर कुठे पडलेला स्लॅब. नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून....
((मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्याच्या व्हिज्युअल्सनी ओपन करावे))
व्हिओ -
पायऱ्यांवरून वाहणारं हे पाणी..
बांधकामाचा कोसळलेला भाग..
आणि
पाणी बाहेर काढण्यासाठी यंत्रणांची सुरु असलेली ही धावपळ..
हे चित्र आहे मुंबई मेट्रो-तीनवरील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाचं.
अंडरग्राऊंड, वॉटरप्रूफ ऍक्वा लाईन असा या मेट्रोचा गौरवानं उल्लेख केला जातो.
मात्र पहिल्याच पावसात हा गौरव गळून पडल्याचं चित्र दिसलं.
बाईट -
वेदांत नेब वॉक-थ्रू मधील चंक सुरुवातीचा चंक वापरावा.
etxm mum aqua line metro station BIPPED wkt 260525 sn
व्हिओ -
काही दिवसांपूर्वी आरे जेव्हीएलआर ते वरळी या मेट्रो मार्गावरील वरळी ते बीकेसी या मार्गिकेचं लोकार्पण करत हा मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यात आला होता.
मात्र पहिल्याच मोठ्या पावसात अंडरग्राऊंड मेट्रोचे असे हाल झाले.
याचं वार्तांकन करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींनादेखील रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पत्रकारांना इथून अक्षरशः हुसकावून लावण्यात आलं.
बाईट -
वेदांत नेब वॉक-थ्रू मधील चंक वापरावा.
etxm mum aqua line metro station BIPPED wkt 260525 sn
((आम्हाला थांबवत आहेत. रेकॉर्डिंग करू देत नाहीत.. हा चंक वापरावा.))
व्हिओ -
ज्या मार्गाचं उद्घाटन करून पूर्ण क्षमतेनं प्रवासी वाहतूक सुरु झाली, त्या मार्गावरच्या मेट्रो स्टेशनमध्ये पाणी घुसणं हा प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केलीय.
((टू विंडो बाईट))
बाईट - आदित्य ठाकरे
etxm worli aditya on metro udghatan byte 260525
((हे जे उद्घाटन केलंय ते कशाचं उद्घाटन केलंय. पोलिसांनी केस टाकली पाहिजे. लाखो मुंबईकरांना मेट्रो वापरायला देताय. काय भयानक प्रकार आहे हा.. कुठल्या स्टँडर्डनं केलंय हे))
बाईट - आदित्य ठाकरे
etxm worli aditya on metro n bjp emergency byte 260525
((काम चालू आहे तर उद्घाटन कशाचं केलं नेमकं. भाजपचं सरकार पैसे खातं, खोटं बोलतं. एक्सलेशन किती झालं, पाणी कसं तुंबलं याची चौकशी व्हावी. माध्यमांना जर सोडत नसतील, तर मग देशात इमर्जन्सी लागू झालीय का))
व्हिओ -
तर उद्घाटन झालेल्या मेट्रो स्थानकात पाणी कसं शिरलं, या प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांची चांगलीच दमछाक झाली. .
बाईट - गिरीश महाजन
R MUM DCM IM BMC OFFICE LIVE 260525
((बारामती दौंड याठिकाणी जास्त पाऊस झाला आहे. मेट्रो ३ आचार्य अत्रे याठिकाणी तात्पुरती बांधण्यात आलेली भिंत पडली. पाण्याचा प्रेशर वाढल्यामुळे भिंत पाडली. अजून ३ महिन्यात हे काम पूर्ण होणार होती))
व्हिओ -
या प्रकारामुळं नागरिकांनी आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय.
बाईट - नागरिकांचे बाईट वापरावेत.
(वेदांतच्या वॉक थ्रूमध्येही काही बाईट आहेत)
व्हिओ -
दरम्यान, अंडरग्राऊंड स्टेशनमध्ये पाणी शिरण्याबाबत मेट्रो तीनकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
((ग्राफिक्स इन))
मेट्रो-३ चं स्पष्टीकरण (हेडर)
मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकाजवळची एक संरक्षक भिंत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे.
मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे.
या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही.
त्यामुळे जिथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता.
तिथे कायमस्वरुपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
हे कायमस्वरुपी काम येत्या 3 महिन्यात होईल.
मात्र तुर्तास तिथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु होते.
हे काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता.
मात्र, पाऊस लवकर आला.
लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पाऊस यामुळे ती पडली.
((ग्राफिक्स आऊट))
व्हिओ -
काही दिवसांपूर्वी नव्यानं बांधण्यात आलेल्या पुणे विमानतळाच्या परिसरातही पावसाचं पाणी शिरलं होतं.
रविवारी तुफान पावसामुळं दिल्ली विमानतळावरील छताचा भाग कोसळला होता.
त्यानंतर आज मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन जलमय झालंय.
मे महिन्यातल्या पावसातच हे चित्र असेल तर पुढच्या चार महिन्यात विकासाचे आणखी कुठले दावे वाहून जाणार, याचीच चिंता आता सर्वसामान्यांना सतावत आहे.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
