एक्स्प्लोर

'T20 क्रिकेटर ऑफ द इयर' बनताच सूर्यकुमारनं रचला इतिहास, धोनी-द्रविडसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान

Suryakumar Yadav Team India: सूर्यकुमार यादवची ICC पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. T20 फॉरमॅटमध्ये हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

Suryakumar Yadav Team India : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर एक खास पुरस्कार मिळवला आहे. टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीमुळे सूर्याने टीम इंडियातही पक्क स्थान निर्माण केलं आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये तो स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यासोबतच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपली चुणूक दाखवली आहे. 2022 हे वर्ष सूर्यासाठी खूप चांगले ठरलं. त्यामुळेच आयसीसीने त्याला वर्षातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार मिळताच त्याने एक खास इतिहास रचला आहे. T20 क्रिकेटमध्ये हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

सूर्यकुमार यादवने क्रिकेटर ऑफ द इयर बनताच इतिहास रचला. ICC पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर बनणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. यासोबतच त्याने महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांच्या यादीतही स्थान मिळवले आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये हा पुरस्कार मिळवणारा द्रविड हा पहिला भारतीय खेळाडू होता. दुसरीकडे, एकदिवसीय फॉरमॅटमध्ये हा पुरस्कार मिळवणारा धोनी पहिला भारतीय खेळाडू होता. धोनीला 2008 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. तर द्रविडला 2004 मध्ये हा किताब मिळाला होता. ज्यानंतर आता टी20 फॉरमॅटमध्ये हा पुरस्कार मिळवणारा सूर्या पहिला खेळाडू ठरला आहे.

द्रविडला कसोटी फॉरमॅटचा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला असून त्याच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो एक दिग्गज म्हणून ओळखला जातो.  त्याने 164 कसोटी सामन्यांमध्ये 12288 धावा केल्या आहेत. यादरम्यान द्रविडने 5 द्विशतकं आणि 36 शतकं झळकावली आहेत. त्याने 63 अर्धशतकंही केली आहेत. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 270 आहे. धोनीला हा पुरस्कार वनडे फॉरमॅटसाठी मिळाला आहे. धोनीच्या एकदिवसीय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याचीही कामगिरी अगदी दमदार राहिली आहे. त्याने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10773 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 10 शतकं आणि 73 अर्धशतकं केली आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 धावा आहे.

ICC क्रिकेटर ऑफ द इयर जिंकणारे पहिले भारतीय

  • कसोटी - 2004 मध्ये राहुल द्रविड
  • एकदिवसीय - एमएस धोनी 2008 मध्ये
  • T20 आंतरराष्ट्रीय - सूर्यकुमार यादव 2022 मध्ये

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
America on Iran: युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा
Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली अन्...; नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली अन्...; नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satish Valanju : Raj Uddhav च्या युतीसाठी आयुष्यभर झटला, सतीश वळंजूंना हुंदका दाटला!
Land scam | खासदार संदिपान भुमरे ड्रायव्हरच्या नावे १५० कोटींची जमीन भेट म्हणून दिल्याचा आरोप
Pune Railway Station Renaming | थोरल्या बाजीरावांच्या नावावरून वाद, मेधा कुलकर्णी भावूक
Anti-Drone Gun | पुणे ग्रामीण पोलिसांनी विनापरवाना ९ ड्रोन पाडले, मालकांची चौकशी सुरू
Washim Rain Damage | वाशिममध्ये पावसाचा कहर, रस्त्यांची दुरवस्था

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
America on Iran: युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा
Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली अन्...; नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली अन्...; नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू
काहीतरी मर्यादा ठेवा, पुण्यात नामांतरावरुन लागलेल्या बॅनवरुन संताप; मेधा कुलकर्णींना रडू कोसळले
काहीतरी मर्यादा ठेवा, पुण्यात नामांतरावरुन लागलेल्या बॅनवरुन संताप; मेधा कुलकर्णींना रडू कोसळले
मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, ले-आऊटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, ले-आऊटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Zohran Mamdani New York Mayor Election: न्यूयॉर्क महापौर निवडणुकीत भारतीय वंशाचे 33 वर्षीय गुजराती मुस्लिम जोहरान ममदानी आघाडीवर; ते आहेत तरी कोण?
न्यूयॉर्क महापौर निवडणुकीत भारतीय वंशाचे 33 वर्षीय गुजराती मुस्लिम जोहरान ममदानी आघाडीवर; ते आहेत तरी कोण?
Raj Thackeray and Uddhav Thackeray: ठाकरे ब्रँड एकत्र यायला हवा, तो एस्टॅब्लिश व्हावा, कारण...; ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा अन् ज्येष्ठ शिवसैनिकाची भावनिक साद
ठाकरे ब्रँड एकत्र यायला हवा, तो एस्टॅब्लिश व्हावा, कारण...; ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा अन् ज्येष्ठ शिवसैनिकाची भावनिक साद
Embed widget
OSZAR »