Honey Trap Case | कळव्याच्या रवींद्र वर्माला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी | देशद्रोहाचा आरोप
ठाण्यातील कळव्याच्या रवींद्र वर्माला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे। ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं रवी वर्माला पाच जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे। वर्मानं देशासोबत गद्दारी का केली? पैशासाठी की त्यालाही हनीट्रॅपच्या माध्यमातून आमिष दाखविण्यात आलं याचा तपास एटीएस अधिकारी करताहेत। आरोपी रवींद्र मुरलीधर वर्मा यानं हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला ही माहिती पुरवली असल्याचं सांगितलं जातंय। कायदेशीर मार्गानी जाण्यासाठी आपल्या त्या पीसीला अमचा आरोपी सहकार्य करतोय आणि त्यांनी आतापर्यंत सुद्धा नोव्हेंबरपासून पूर्णपणे तपासाला सहकार्य केलेलं आहे आणि आताही तो करतोय। बघूया आम्ही कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि देश-देशाच्या विरुद्ध त्यांनी काही केलेलं नाही हे पुढे पुराव्यामध्ये येईलच। युद्धनौका वगैरे ह्याच्या ज्या माहित्या आहेत या ऑलरेडी गुगलवर सगळ्या अवेलेबल आहेत आणि पोलिसांनी जो मांडलेला आहे मुद्दा की त्यांनी पुरवलेले आहेत नकाशे वगैरे तर हे धादांत खोटं आहे. जे त्यांनी दिलेलं आहे ते सगळं गुगलवरुन काढूनच दिलेलं आहे, जे की आपल्या प्रत्येकासाठी गुगलवर अवेलेबल आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
