एक्स्प्लोर
Suryakumar Yadav : 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमधील चूक टाळली, टीम इंडियानं वर्ल्ड कोणत्या रणनीतीनं जिंकला, सूर्यानं सगळं सांगितलं
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या डेव्हिड मिलरच्या कॅचमुळं भारतानं दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानं या वर्ल्ड कपच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं.

सूर्युकमार यादव
1/7

सूर्यकुमार यादव म्हणाला की आम्ही 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये कशा प्रकारे खेळलो होतो याचा आढावा घेतला.2024 मध्ये आम्हाला कसं खेळायचं हे ठरवलं होतं.
2/7

सराव सामने सुरु होण्यापूर्वी आम्ही बैठक घेतली, 2022 मध्ये ज्या चुका झाल्या त्या 2024 मध्ये चुका न करण्याचा निर्णय घेतला होता, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
3/7

आम्ही 30 वर तीन असो किंवा 30 वर पाच विकेट गेल्या तरी आपल्याला कसं खेळायचं आहे याचा विचार केला होता. त्यानुसार अक्षर पटेलनं दमदार कामगिरी केल्याचं आपण पाहिलंय, असं सूर्यकुमार यादवनं सांगितलं.
4/7

सूर्यकुमार यादवनं पत्नीच्या गळ्यात पडून खूप रडल्याचं म्हटलं. 2023 ला ग्राऊंडवर जाऊन ट्रॉफी घ्यायचीय असं वातावरण होतं. मात्र, आम्ही यावेळी टुर्नामेंटबद्दल चर्चा केली नाही. आमचे जिथं पाय आहेत तिथंच आमचं डोक आहे, असं सूर्युकमार यादवनं म्हटलं.
5/7

चार सेकंद, तीन सेंकदात जे योग्य वाटलं ते केलं, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. आमच्या प्रशिक्षकांनी यासाठीच तयारी करुन घेतली होती, असं सूर्यकुमार यादवनं म्हटलं.
6/7

यशाच्या शिखरावर रोहित शर्मा अन् विराट कोहली यांनी टी 20 क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षात भारतात वर्ल्ड कप आहे असं सांगितलं पण त्या दोघांनी मनाची तयारी केली होती, असं सूर्यकुमार यादवनं म्हटलं.
7/7

टीमची मानसिकता बदलली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आहे. पण, चॅम्पियन्स ट्रॉफी येत आहे. कॅप्टन पण तोच, संघही तोच असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
Published at : 01 Jul 2024 02:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
बातम्या
बातम्या