एक्स्प्लोर
Jasprit Bumrah News : 'विक्रमवीर' बुमराह! पहिल्या डावात 5 शिकार; कसोटी इतिहासात सुवर्णाक्षरात नोंद
IND Vs ENG 1st Test : भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळला जात आहे.

Jasprit Bumrah IND Vs ENG 1st Test
1/9

भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळला जात आहे.
2/9

प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 471 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर इंग्लंड पहिला डाव 465 धावांवर ऑलआऊट झाला.
3/9

अशाप्रकारे, पहिल्या डावाच्या आधारे भारताला 6 धावांची आघाडी मिळवता आली.
4/9

स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एकट्याने इंग्लंडच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
5/9

बुमराहने 24.4 षटकांत 83 धावांत 5 विकेट घेतले आणि त्याच्या कसोटी कारकिर्दीत 14 व्यांदा 5 बळी घेतले. अशाप्रकारे, त्याने विक्रमांची एकहाती नोंद केली.
6/9

जसप्रीत बुमराहने इंग्लंडमधील कसोटी सामन्याच्या डावात तिसऱ्यांदा 5 बळी घेण्याचा मोठा पराक्रम केला.
7/9

यासह, तो इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक 5 बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला.
8/9

याआधी इंग्लंडच्या भूमीवर कोणत्याही भारतीय गोलंदाजाला 3 वेळा 5 बळी घेण्याची कामगिरी करता आली नव्हती. बुमराहने 9 भारतीय गोलंदाजांना हरवून ही मोठी कामगिरी केली.
9/9

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जसप्रीत बुमराह हा SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये 150 बळी घेणारा पहिला आशियाई गोलंदाजही ठरला आहे.
Published at : 22 Jun 2025 09:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
विश्व