एक्स्प्लोर
Operation Sindoor : पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली अन् भारतीय सैन्याला हवं होतं तेच घडलं! अवघ्या 23 मिनिटात पाकड्यांचा करेक्ट कार्यक्रम!
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानला केवळ त्याच्या ताकदीची जाणीवच करून दिली नाही तर त्याला एका खेळीने अक्षरक्ष: मूर्ख बनवत पाकिस्तानी ड्रोनला हवेतच नष्ट केलेय.

Operation Sindoor
1/9

Operation Sindoor : युद्धातील विजय हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर शक्तीने ठरत नाही तर ते लढण्यापूर्वी बुद्धीच्या जोरावर आखलेल्या डापेचावर अवलंबून असतो. आणि भारतीय सैन्य शक्ती आणि बुद्धीच्या बाबतीत जगाच्या इतिहासात कायम अग्रस्थानी राहिला आहे. हे सर्वश्रुत आहे. त्याचाच परत एकदा प्रत्यय भारत-पाकिस्तान दरम्यानच्या हवाई हल्ल्याच्या निमित्याने जगाला बघायला मिळाला आहे.
2/9

पहलगाम हल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारतीय सैन्यांनं राबवलेल्या आणि फत्ते केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी शेकडो ड्रोनही पाठवविल. हे करत असताना त्यावर शस्त्र लादलेले नव्हती. तर भारताची एअर डिफेन्स सिस्टीम कुठे कुठे आहे, हे जाणून घेण्याच्या उद्देश पाकिस्तानचा होता. परंतू, असे करताना पाकिस्तान सफशेल विसरला की भारत हा आपल्यापेक्षा सर्वार्थानं कितीतरी पट सरस आहे. किंबहुना पाकड्यांचा हाच डाव लक्षात घेता भारतीय सैन्यांनंही गेम खेळेला आणि पाक सैन्यांचा करेक्ट कार्यक्रम केला.
3/9

पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या प्रत्येक कारवाईला भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींन अचूक टिपत पाकिस्तानचे शेकडो ड्रोन्स हवेत वरच्या वर उध्वस्त केले. पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसले खरे परंतू हे ड्रोन निशस्त्र असल्याचे समजताच युद्धतज्ञांनी पाकिस्तानच्या या खेळीमागील त्यांचा उद्देश आणि डाव अचूक ओळखला आणि मग तो जगजाहीरही केला. थोडक्यात पाकिस्तानला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम कुठे कुठे आहेत, हे जाणून घ्यायचे होतं. पण इथंही त्यांना मार खावा लागला असून हार पत्करावी लागली.
4/9

पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले होतोय हे लक्षात येताच भारताने एअर डिफेन्स सिस्टीम लगेच अॅक्टीव्हेट केली. आणि पुढं व्हायचं ते झालं. भारताच्या त्या तगड्या एअर डिफेन्स सिस्टीम पुढं ड्रोन तर सोडाच पाकिस्तानी मिसाईल, लढाऊ विमानही टिकू शकली नाही. त्यांना अचूक टिपत वर हवेतच उडवून देण्यात आलं.
5/9

दुसरीकडे मात्र, भारताने पाकिस्तानच्या हद्दीतील अनेक तळ बेचिराख केली. त्यात अगदी चीनकडून कर्जावर घेतलेली महागडी एअर डिफेन्स सिस्टीम देखील अक्षरक्ष: उध्वस्त केली. त्या पाठोपाठ ब्राम्होस मिसाईलने पाकिस्तानात हल्ला करत एकच हाहाकार उडवून रात्रीच्या अंधारत दिवस उजाडून दिला.
6/9

केवळ वल्गना करत धमकी देणाऱ्या पाकिस्तानकडे स्वत:ची अशी एअर डिफेन्स सिस्टीम आहे. परंतू ती नेमकी कुठल्या भागात तैनात आहे, याचा शोध भारतीय सैन्याला घ्यायचा होता. त्या अनुषंगाने भारतीय हवाई दलाने प्लॅन आखला आणि त्याचा अचूक ठावठिकाणा शोधून काढला.
7/9

यासाठी भारतीय हवाई दलाने मोठी खेळी केली आणि पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात kaaही डमी लढाऊ विमाने घुसविली. हे विमानं अगदी खऱ्या लढाऊ विमानांप्रमाणे भासवलं आणि इथंच पाकिस्तानचा गेम झाला. त्यांनी लगेचच एअर डिफेन्स सिस्टीम अॅक्टीव्हेट केली आणि गेम इथेच फिरला. भारताला जे हवं होतं तेच घडलं आणि पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमचे अचूक लोकेशन सापडलं. त्यानंतर पुढचा यथोचित कार्यक्रम ब्राम्होस मिसाईलनी उरकून टाकला.
8/9

यानंतर कुठलाही विलंब न करता भारतीय सैन्यानं योजना आखली आणि पाकिस्तानी एअरबेसवर ब्राम्होस मिसाईलचा अक्षरक्ष: पाऊस पाडण्यास सुरुवात केली
9/9

जवळपास 23 मिनिटांच्या या खेळीनं भारताने डमी जेट्सच्या मदतीने पाकिस्तानची डिफेन्स सिस्टीम पुरती जाम केली. या काळात भारताने जवळ जवळ 15 ब्राम्होस मिसाईल पाकिस्तानवर डागली. त्यातील 13 पैकी 11 एअरबेसवर हल्ला करून भारताने पाकिस्तानी हवाई दलाचे कंबरडेच मोडलं. परिणामी, पाकिस्तान भारतापुढं झुकला अन् सीझफायर करण्याची विनवणी करू लागला.
Published at : 18 May 2025 08:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
सोलापूर
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
