एक्स्प्लोर
Lifestyle: घरात ठेवू नका 'या' 10 वस्तू; वाईट आणि नकारात्मक गोष्टींपासून होईल सुटका
Lifestyle: आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात, ज्यामुळे आपल्या जीवनात वाईट घडतं, नकारात्मकता वाढते. त्यामुळे सुखी जीवनासाठी अशा गोष्टी घरात ठेऊ नये.

Do not keep these 10 things in the house
1/10

तुटलेल्या वस्तू: घरात तुटकी भांडी, काचा, तुटलेलं इलेक्ट्रिक सामान, तुटलेलं कपाट, पलंग, बंद घड्याळ, असं कोणतंही सामान घरात ठेवू नये. याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो.
2/10

हे फोटो ठेवू नका: बुडत्या जहाजाचे फोटोफ्रेम, महाभारताच्या युद्धातील चित्र, नटराजची मूर्ती, ताजमहालचे चित्र घरात लावू नये. याने नकारात्मकता वाढते आणि मनावर वाईट परिणाम होतो.
3/10

जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोडं: अनेकांच्या कपाटात खाली किंवा घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोडं ठेवलेलं असतं. यामुळेही वाईट गोष्टी घडतात.
4/10

फाटक्या चादरी आणि कपडे: या गोष्टींमुळेही घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे असे कपडे दान केले पाहिजे.
5/10

भंगार: अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात. जुन्या-फाटलेल्या चपला वैगेरे घरात ठेवू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.
6/10

फाटलेल्या पर्स: कधीही फाटलेल्या पर्स वापरू नये, यामुळे तुमचा आहे तो पैसा निघून जाईल.
7/10

तुटलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो: देवी-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती खालावते, घरावर विघ्न येतात. त्यामुळे असे फोटो नदी, तलावांत विसर्जित केले पाहिजे.
8/10

कोळी जाळं: घरात कोळ्यांचं जाळं असल्यास ते त्वरित काढून टाकावं, यामुळेही वाईट गोष्टी घडतात.
9/10

प्लास्टिकच्या वस्तू: किचनमध्ये किंवा घरात प्लास्टिकच्या वस्तू वापरणं बंद केलं पाहिजे. या वस्तू वापरण्याने त्यातील विषारी तत्त्व शरिरात पोहोचतात आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका वाढतो.
10/10

दगड: अनेक लोकांना आपल्या घरात शोपीसचे दगड ठेवण्याची हौस असते, पण यामुळे बरंच नुकसान होतं.
Published at : 03 Oct 2023 05:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
व्यापार-उद्योग
गडचिरोली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
