एक्स्प्लोर
Raj Thackeray-Uddhav Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा; राज ठाकरे समोर येताच सुप्रिया सुळेंनी विचारला प्रश्न, म्हणाल्या...
Raj Thackeray-Uddhav Thackeray: महाराष्ट्र दिनी म्हणजेच काल (1 मे) मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुंबईतील हुतात्मा चौकात भेट झाली.

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance
1/9

महाराष्ट्र दिनी म्हणजेच काल (1 मे) मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुंबईतील हुतात्मा चौकात भेट झाली.
2/9

सुप्रिया सुळे देखील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली.
3/9

सुप्रिया सुळे हुतात्मा चौकातून अभिवादन करुन माघारी परतत होत्या, तर राज ठाकरे अभिवादन करण्यासाठी हुतात्मा चौकात दाखल झाल्या होत्या. यावेळी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट झाली.
4/9

राज ठाकरे समोर येताच ट्रीप कशी झाली?, असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला. तसेच तब्यतेची विचारपूसही केली.
5/9

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर देखील सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं.
6/9

ठाकरे आणि पवारांचे सहा दशकांचे प्रेमाचे संबंध आहे. राजकीय टोकाची भूमिका घेतली, मात्र त्यांनी कौटुंबिक संबंध जपले, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
7/9

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही मला भावासमान आहेत. ते दोघं एकत्र आले तर मला आनंद आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.
8/9

राज ठाकरे नुकतेच परदेश दौऱ्यावरुन परतले, तर उद्धव ठाकरे अजूनही परदेश दौऱ्यावर आहेत.
9/9

राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत ठाकरे गट सकारात्मक आहेत, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Published at : 02 May 2025 08:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
पुणे
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
