एक्स्प्लोर
Bail Pola 2024 : विदर्भात बैल पोळ्यानिमित्य अनोखी परंपरा; चिमूकल्यांच्या आकर्षक वेषभूषेसह लाखडी नंदीही सजला
Bail Pola 2024 : शेतीत मशागत करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा होतो. तर विदर्भाची पारंपरिक ओळख असलेला नंदी बैल पोळा आज नागपूरसह संपूर्ण विदर्भात साजरा केला जात आहे.

Bail Pola 2024
1/11

बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतीत मशागत करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा होतो.
2/11

विदर्भात पोळा दोन दिवस साजरा केला जातो.
3/11

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो.
4/11

त्या दिवशी नागपूरमध्ये निघणारे मारबत हे शहराच्या सांस्कृतिक इतिहासातले मोठे वैभव आहे.
5/11

विदर्भाची पारंपरिक ओळख असलेला नंदी बैल पोळा आज नागपूर सह संपूर्ण विदर्भात साजरा केला जात आहे.
6/11

लहान मुलं आकर्षक वेषभूषेसह लाखडी नंदी बैलला घेऊन पोळ्याच्या तोरणात येतात.
7/11

लहान मुलांना कृषीप्रधान भारताची ओळख व्हावी, त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे यासाठी नागपूरच्या भोसले घराण्याने हि परंपरा सुरु केली होती.
8/11

नागपूरच्या अनेक भागात बच्चे कंपंनी आपल्या लाखडी नंद्याला घेऊन आकर्षक वेशभूषेत तान्हा पोळ्यात आले आहेत.
9/11

यावेळी बाल गोपाल आपला नंदी घेऊन सज्ज झाले आहेत.
10/11

पोळ्याच्या दिवशी ही मंडळी परिसरातील घरोघरी जाऊन बोजारा अर्थात पैसे स्वरूपात ओवाळणी मागत असतात.
11/11

असा सण केवळ विदर्भातच बघायला मिळतो हे विशेष
Published at : 03 Sep 2024 06:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement