मुंबई सिरीयल बॉम्बस्फोटातील कुविख्यात दहशतवादी साकिब नाचनवर आज होणार अंत्यसंस्कार; भिवंडीत मोठा फौजफाटा, पडघा ग्रामस्थांचा विरोध
साकिब नाचन याच्या दफनविधी निमित्त बोरिवली व पडघा परिसरात ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासह भिवंडी शहर महामार्गावर सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केल्याचे चित्र आहे.

ठाणे : मुंबई सिरीयल बॉम्ब ब्लास्टसह अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सक्रिय सहभाग असलेला आणि कुविख्यात दहशतवादी (Terrorist) म्हणून ओळखला जाणारा साकिब नाचण (Sakib Nachan) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडलीय. भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पडघा-बोरिवली हे साकिब नाचण याचं मूळगाव आहे. परिणामी साकिब नाचन याचा मृतदेह आज भिवंडी येथील बोरवली गावात आणण्यात येणार आहे, त्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. साकिब नाचन याच्या दफनविधी निमित्त बोरिवली व पडघा परिसरात ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासह भिवंडी शहर महामार्गावर सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केल्याचे चित्र आहे.
साकिब नाचनचा मुलाला अंत्यसंस्कारमध्ये सहभागी होण्यास परवानगी
दरम्यान, साकिब नाचनचा मुलगा शामिल नाचन याला वडिलांच्या अंत्यसंस्कारमध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तसेच साकीब नाचन याचा मृतदेह त्याच्या आईच्या कबरीच्या बाजूला बनवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आहे. त्याच ठिकाणी साकिबचा दफन विधी होणार असल्याचेही बोललं जात आहे. मुंबई सिरीयल बॉम्ब ब्लास्टमध्ये साकीब नाचन हा मुख्य आरोपी होता. त्यानंतर ISISI मोड्युलमध्ये डिसेंबर 2023 मध्ये NIA ने पुन्हा त्याला अटक केली होती. दिल्ली येथील तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, तिथे ब्रेन स्टॉक आल्याने पुढील उपचारसाठी साबिकला दीनदयाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साकिब नाचन याचा मृतदेह भिवंडी येथील बोरवली गावात आणण्यात येणार आहे, त्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे.
पडघ्याच्या हद्दीतील कब्रस्तानामध्ये अंत्यसंस्कार करण्यास पडघा ग्रामस्थांचा विरोध
पडघा गावाच्या हद्दीतील गुरचरणाच्या जमिनीवर अवैध पद्धतीने बोरिवली ग्रामस्थ दफनभूमी सारखा वापर करतात. सदरील प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असून आता मृत्यू पावलेला अतिरेकी साकिब नाचन हा बोरिवली गावचा रहिवासी असून त्याचे प्रेत दफन करण्यास बोरिवली गावाची दफनभूमी कब्रस्तान उपलब्ध आहे. तरीही पडघा गावाच्या हद्दीतील कब्रस्तानात सदरील साकीब नाचण याचे दफन करण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. सदरील न्यायप्रविष्ठ प्रकरणात अतिरिक्त वाद उद्भवू नये तसेच लोक भावनांचा आदर करून साकिब नाचन याचे प्रेत बोरिवली कब्रस्तानामध्ये पुरण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी पडघा ग्रामस्थ करत आहेत. तसेच यापूर्वी पडघा ग्रामपंचायतीने तशा स्वरूपाचा ठराव सुद्धा पारित केला होता. याच कब्रस्तानाच्या केसच्या वादांवरून वकील शेरेकर यांची हत्या करण्यात आली होती.
हे ही वाचा