एक्स्प्लोर
Ankita Prabhu Walawalkar Wedding Photos: वालावलकरांचो थोरलो जावई... नवऱ्यासाठी खास पोस्ट करत 'कोकण हार्टेड गर्ल'नं शेअर केले लग्नाचे PHOTO
Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Wedding Photos: 'कोकण हार्टेड गर्ल'चा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Wedding Photos
1/11

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठीमुळे घराघरांत पोहोचलेली 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरनं आपला बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली.
2/11

अंकिता आणि कुणालचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
3/11

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरनं तिच्या शाही सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
4/11

अंकिता प्रभू वालावलकरनं स्वतः इन्स्टाग्राम फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 'वालावलकरांचो थोरलो जावई', असं कॅप्शन अंकितानं लग्नाचे फोटो शेअर करताना दिलं आहे.
5/11

अंकितानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, "मी त्याची पत्नी झालेय, याकरता माझा नवरा कुणाल भगतचे खूप अभिनंदन... तो धन्य झालाय."
6/11

अंकितानं लग्नासाठी खास पिवळ्या जरदोसी नक्षी असलेली सुंदर साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, मुंडावळ्या, गळ्यात डिझायनर नेकलेस असा काहीसा लूक कोकण हार्टेड गर्लनं आपल्या लग्नासाठी केला होता.
7/11

कुणालनं लग्नासाठी मराठमोळा पेहराव केला होता. अंकितानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघांचा जोडा अगदी सुरेख दिसत आहे.
8/11

लग्नानंतर केलेल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये अंकितानं आपल्या लग्नाच्या ठिकाणाचा उल्लेख केला आहे.
9/11

अंकिता-कुणाल यांचा शाही विवाहसोहळा कोकणातील प्रसिद्ध मंदिरात पार पडला. दोघांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावलमध्ये असणाऱ्या 'लक्ष्मीनारायण मंदिरा'त लग्नगाठ बांधली.
10/11

अंकिताचा नवरा कुणाल भगत हा मराठी सिनेविश्वातील संगीतकार आहे. तसेच, त्यानं अनेक मालिकांची शीर्षकगीतं देखील संगीतबद्ध केली आहेत.
11/11

'येक नंबर' या सिनेमासाठी कुणालनं संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच, 'झी मराठी'च्या लोकप्रिय मालिकांना देखील त्यानं संगीत दिलं आहे.
Published at : 17 Feb 2025 07:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
भारत
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
