Gold Price: अमेरिका-चीनमुळं सोन्याचे दर घसरले, 10 ग्रॅम सोनं 85 हजारावर येणार का? जाणून घ्या
Gold Rate : सोन्याचे दर 50 दिवसांच्या बदलत्या सरासरीच्या खाली पोहोचले आहेत. जर अशीच स्थिती कायम राहिली तर दर घसरु शकतात.

Gold Price नवी दिल्ली: 22 एप्रिलला सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा पार केला होता. आता सोन्याचे दर 92000 ते 95000 हजारांच्या दरम्यान आहेत. 16 मे म्हणजे आज सोन्याचे दर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 1 टक्क्यांनी घसरले. सोन्याच्या दरातील प्रमुख कारण अमेरिका आणि चीनमधी व्यापारासंदर्भातील तणाव कमी होणं हे आहे. अमेरिका आणि चीननं सामंजस्यानं 90 दिवसांपर्यंत लावण्यात आलेलं टॅरिफ कमी केलं आहे. यामुळं गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी गुंतवणुकीचे दुसरे मार्ग स्वीकारले आहेत.
डॉलर मजबूत झाल्यानं सोन्याचे दर घसरले
डॉलर निर्देशांक सलग चौथ्या आठवड्यात मजबूत झाला आहे. यामुळं इतर चलन धारकांसाठी सोनं महाग होतं जातं, परिणामी मागणी घटते. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे दर घसरतात. स्पॉट गोल्ड 3210.19 डॉलर प्रति औंसपर्यंत आलं आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात 3 टक्के घसरण झाली आहे. नोव्हेंबर 2024 नंतरची ही मोठी साप्ताहिक घसरण आहे.
US फेडरल रिजर्व्हच्या धोरणातून दिलासा नाही
तज्ज्ञांच्या मते यूएस फेडकडून व्याजदरात कपात करण्या संदर्भात कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. ज्यामुळं बुलियन मार्केटमध्ये सोनं खरेदीचा उत्साह कमी झाला आहे. जोपर्यंत व्याजदर घटणार नाहीत तोपर्यंत सोन्याचं आकर्षण कमी होतं.
टेक्निकल चार्टचा कल काय?
द मिंटमधील एका रिपोर्टनुसार सोन्याचे दर 50 दिवसांच्या बदलत्या सरासरीच्या खाली आलं आहे. नोव्हेंबर 2024 पासून सोन्याच्या वाढत्या दाराला आधार होता. हा आधार तुटला असता तर सोन्याचे दर आणखी घसरले असते. 3136 डॉलर प्रति औंस हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. याच्या खाली सोनं गेल्यास ते 2875-2950 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतं.
या रिपोर्टमध्ये काही तज्ज्ञांनी म्हटलं की सोनं जोपर्यंत 94000 च्या खाली आहे तोपर्यंत कमजोर असेल. जर त्याच्या खाली सोनं गेलं आणि 89500 चा स्तर कमी होऊन तो 85000 रुपयांचा सपोर्ट असेल.
गुंतवणूकदारांनी काय करावं?
डॉलरचा विचार केला असता सोन्याचे दर प्रति औंस 2940 डॉलर ते 3320 डॉलरमध्ये स्थिरावले आहेत. या दरम्यानच्या हालचालींवर गुंतवणूकदारांना लक्ष द्यावं लागेल. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर घसरणीकडे संधी म्हणून पाहावं. शॉर्ट टर्म ट्रेडर्सला सतर्क राहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
