एक्स्प्लोर
Indrayani Colours Marathi Serial Track: 'इंद्रायणी' मालिकेत मोठा ट्वीस्ट, गोपाळ इंदुवरच्या प्रेमाची कबुली देणार; पुढे काय घडणार?
Indrayani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) इंद्रायणी (Indrayani) मालिकेत इंद्रायणी मोहितरावांच्या आव्हानाला स्वीकारते.

Indrayani Marathi Serial Track
1/11

"पुढच्या एका वर्षात मी विठूच्या वाडीत शाळा सुरू करून दाखवेन!" इंदू हे वचन कसं पूर्ण करणार?
2/11

गोपाळ, अधू आणि संपूर्ण गावाची साथ तिला कशी मिळणार? इंदूचं हे वचन मालिकेला नवं वळण देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
3/11

अशातच आता मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे. ज्याची प्रेक्षक वाट पाहत होते. गोपाळ इंदूवर असलेल्या प्रेमाची कबुली देणार आहेत.
4/11

दुसरीकडे अधूला देखील इंदू आवडते असं दिसून आलं आहे. पुढे मालिकेत काय होणार? कुठलं वळण येणार?
5/11

इंद्रायणी मालिकेत व्यंकू महाराज आणि इंद्रायणी आपल्या कीर्तनातून मोहितरावचा खरा चेहरा गावासमोर आणतात.
6/11

यामुळेच मोहितराव चिडतो, तो इंदूवर आधीपासूनच वाईट नजर ठेवून आहे आणि आता तो स्वतःच्या अपमानाचा बदला घ्यायचं ठरवतो.
7/11

मोहितराव इंदूवर हात टाकण्याचा प्रयत्न करतो, तिथे गोपाळ येतो आणि इंदूला त्याच्या तावडीतून सोडवतो.
8/11

मोहितरावला बजावून सांगतो की, माझ्या इंद्रायणीवर हात टाकणाऱ्याचा मी जीव घेईन. कारण माझं तिच्यावर प्रेम आहे.
9/11

गोपाळच्या प्रेमाच्या कबुलीनंतर मालिकेत काय घडणार? इंदू त्यावर काय उत्तर देणार? आणि कसं गोपाळ - इंदूचे प्रेम फुलणार? या सगळ्यात मोहीतराव आता काही शांत बसणार नाही.
10/11

मोहितरावाचा आता इंदूला विरोध असल्याने तिला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागणार आहे.
11/11

इंदू गावात शाळा उघडण्याचं आव्हान व्यंकू महाराज, गोपाळ - अधू आणि फँटया गँगच्या सहाय्याने कसे पूर्ण करणार हे बघणे उत्सुकतेचं असणार आहे.
Published at : 05 May 2025 02:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
