एक्स्प्लोर
Buldhana : लोणारच्या प्राचीन दैत्यसुदन मंदिरातील विष्णुदेव सूर्य किरणोत्सव सुरु; खगोल आणि वास्तूशास्त्राचा अनोखा संगम, PHOTO
Buldhana : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठी 9 ते 12 व्या शतकात निर्माण करण्यात आलेलं प्राचीन असं भगवान विष्णूंचं मंदिर आहे.

Buldhana
1/9

लोणार येथील प्राचीन दैत्यसुदन मंदिरातील विष्णुदेव सूर्य किरणोत्सव सुरु झाला आहे.
2/9

यामध्ये खगोलशास्त्र आणि वास्तूशास्त्राचा अनोखा संगम जुळून आला आहे.
3/9

जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठी 9 ते 12 व्या शतकात निर्माण करण्यात आलेलं प्राचीन असं भगवान विष्णूंचं मंदिर आहे.
4/9

हे मंदिर त्याकाळच्या वास्तुशास्त्राचं अतिशय सुंदर असं उदाहरण असून खजुराहो मंदिराच्या शैलीत हे मंदिर उभारण्यात आलं आहे.
5/9

सध्या या मंदिरातील सूर्य किरणोत्सव सुरू असून चार दिवस हा उत्सव सुरू असणार आहे .
6/9

मंदिराच्या कळसाला एक छिद्र असून मे महिन्यात या छिद्रातून सूर्याचे किरण गाभाऱ्यातील भगवान विष्णूंच्या मस्तकापासून ते पायापर्यंत पडतात.
7/9

सलग चार दिवस दुपारच्या सुमारास सूर्यकिरण भगवान विष्णूच्या मूर्तीवर पडत असतात या काळाला सूर्य किरणोत्सव साजरा करण्यात येतो.
8/9

या काळात अनेक खगोल आणि वास्तुशास्त्रज्ञ, पर्यटक या मंदिराला भेटी देत असतात.
9/9

सध्या हा सूर्य किरणोत्सव सुरू असून येत्या 20 मे पर्यंत सूर्याची किरणे मंदिरातील गाभाऱ्यात पडत राहणार आहेत.
Published at : 18 May 2025 11:22 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बातम्या
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
