Pimpri Chinchwad | 36 बंगले का जमीनदोस्त? Indrayani नदीकाठी बेकायदेशीर बांधकाम पाडलं Special Report
तब्बल एक ते दीड कोटी रुपये खर्चून बांधलेली घरं, जर डोळ्यादेखत बेचिराख झाली तर? पिंपरी चिंचवडमधील छत्तीस बंगलो धारकांवर ही वेळ आलीये. इंद्रायणी नदीच्या पुररेषेत त्यांनी उभारलेले बंगले पालिकेने काही तासांतच जमीनदोस्त केलेत. गेली वर्षभर सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्यानंतर इथल्या तीनशे रहिवाशी बेघर झालेत. रिव्हर व्ह्यू च्या नावाखाली मनोज जरे नामक बिल्डरने या सर्वांची फसवणूक केलीये अन पालिकेच्या अनधिकृत विभागाची त्यांना साथ लाभलीये. असे आरोप बेघर झालेल्या रहिवाश्यांनी केलेत. त्यामुळं बिल्डर आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणं अपेक्षित आहे....
स्वप्नातली घरं डोळ्यादेखत बेचिराख... कोट्यवधी खर्चून बांधलेली घरं जमीनदोस्त पिंपरी चिंचवडमधील ३६ बंगले जमीनदोस्त होण्याला कारणीभूत कोण? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या पूररेषेत उभारण्यात आलेले ३६ बंगले तोडायला पालिकेने सुरुवात केली... इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेली बांधकामं तोडली गेली.
दरम्यान या बंगल्यावर कारवाईचा निर्णय एका दिवसांत झालेला नाही. यासाठी न्यायालयीन लढाई भरपूर लढली गेली
'३६' बंगल्यांचं नेमकं प्रकरण काय? २०१७ साली पहिला बंगला उभा राहिला वकील तानाजी गंभीरेंनी पालिकेला सांगितलं, पण पालिकेने दुर्लक्ष केलं, हरित लवादात याचिका दाखल कोरोनामुळे सुनावणी रखडली. प्रत्यक्षात सुनावणी सुरु झाली, तेंव्हा परिसरात तीन बंगले उभे होते. परंतू २९ बंगले उभारल्याची सुनावणीदरम्यान पालिकेनं माहिती सादर केल्याचा तक्रारदाराचा दावा १ जुलै २०२४ मध्ये बंगल्याची संख्या ३६ वर पोहचली हरित लवादाने ताशेरे ओढले सहा महिन्यात बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश पालिकेला संबंधितांकडून ५ कोटींचा दंड वसुलण्याच्या सूचना ३१ डिसेंबर २०२४ ला ही मुदत संपणार तेंव्हा सर्वोच्च न्यायालयानं कारवाईला स्थगिती दिली सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी, ५ मे २०२५ला तातडीनं या बंगल्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
