एक्स्प्लोर

Yavatmal Crime News: मुख्याधापिकेने पतीला संपवलं, विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेह जंगलात जाळला; अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे यवतामळमधील क्राईम मिस्ट्रीचा उलगडा

Yavatmal Crime News: मुख्याध्यापक पत्नीनेच पतीला विष देऊन त्याचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यवतमाळ : यवतमाळमधील चौसाळा जंगलात 15 मे रोजी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्या मृतदेहामागचं गुढ उकलण्यात यवतमाळ पोलिसांना यश आलं आहे. पोलिस तपासात धक्कादायकउलगडा झाला असून मुख्याध्यापक पत्नीनेच पतीला विष देऊन त्याचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

फोटोतील शर्ट अन् मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा सेम

मिळालेल्या माहितीनुसार, शंतनू अरविंद देशमुख (32, रा. सुयोगनगर) यांचा तो मृतदेह असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. शंतनू 13 मेच्या सायंकाळपासून बेपत्ता होता. तो सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होता, तर त्याच ठिकाणी पत्नी निधी (वय 23) ही मुख्याध्यापिका होती. प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त राहत होता. जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये कुजबुज सुरू झाली. पोलिसांनी मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एकाच्या मोबाइलमध्ये शंतनूचा 13 मे रोजीचा फोटो दिसला. त्याच्या अंगातील सदरा आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच आढळून आले होते. येथूनच पोलिसांची तपासाची दिशा निश्चित झाली.

पहिल्यांदा आरोपी पत्नी निधीने पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, तिच्या घरात आढळलेली अंडरवेअर व मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर एकाच कंपनीची असल्याने पोलिसांचा संशय आधिक बळावला. तिच्यावर मानसिक दबाव निर्माण करताच निधीने हत्येचा संपूर्ण घटनाक्रमच कबुलीतून सांगितला आहे. मृतदेह जाळण्यास मदत केलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुगलवरून तयार केले विष

शंतनू दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला. तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले. दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

शर्टाचा तुकडा व बटनावरून पटली ओळख

अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या शरिरावरील शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन पुराव्यासाठी जप्त करण्यात आले होते. मृताची ओळख पटली नसल्याने पोलीस स्टेशन हद्दीत तसेच यवतमाळ जिल्ह्यातील तसेच आजुबाजुचे जिल्हे वाशीम वर्धा अमरावती ग्रामीण दाखल बेपत्ता लोकांची माहिती घेण्यात आली. यवतमाळ जिल्हयातील दाखल न झालेल्या बेपत्ता इसमांचा शोध घेतला असताना पोलिसांना माहिती मिळाली की, सनराईज स्कुल येथे कार्यरत शिक्षक शंतनु देशमुख हे मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यावरुन त्याचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षिरसागर, राजेश ऊईके तसेच सुजीत भांदक्कर यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. यामध्ये शंतनु देशमुख हा दिनांक 13 मे पासून त्यांचे संपर्कात नसल्याचे सांगितले. 18 मे रोजी घटनास्थळावरुन जप्त अर्धवट जळालेल्या शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन हे शंतनु देशमुख याचे असल्याचे मित्रांनी ओळखले.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi : चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 08 PM TOP Headlines 26 May 2025 संध्याकाळी 8 च्या हेडलाईन्सMaharashtra Rain :  महाराष्ट्रात धोधो पाऊस, धबधबे प्रवाहित, काही ठिकाणी मोठं नुकसानSatara Rain Bike Video : साताऱ्यात रस्त्याची दैना,पठ्ठ्याने बाईक खांद्यावर घेत केला रस्ता पारMumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; Metro स्टेशन जलमय, नागरिकांचे हाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi : चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक
मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक
Cricket News : सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले, तब्बल 424 धावांनी पराभव
सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले
LIC कडून 'या' कंपनीचे 1,49,000 शेअर खरेदी, अपडेट कळताच स्टॉक बनला रॉकेट, जाणून घ्या अपडेट
LIC कडून 'या' कंपनीचे 1,49,000 शेअर खरेदी, अपडेट कळताच स्टॉक बनला रॉकेट, जाणून घ्या अपडेट
Tej Pratap Yadav : तेजप्रतापच्या लफड्याबद्दल माहिती होतं, तर माझं आयुष्य का बरबाद केलं? ऐश्वर्या रायचा लालूंच्या कुटुंबाला मोठा प्रश्न
तेजप्रतापच्या लफड्याबद्दल माहिती होतं, तर माझं आयुष्य का बरबाद केलं? ऐश्वर्या रायचा लालूंच्या कुटुंबाला मोठा प्रश्न
Embed widget
OSZAR »