India Pakistan Conflicts : शाहबाज शरीफ म्हणतात 'आम्ही शांततेसाठी तयार', तर पाकिस्तानी लष्कराच्या नुसत्याच वल्गना, म्हणाले 'यावेळीचं उत्तर खूप क्रूर असेल'

India Pakistan Ceasefire : युद्धबंदीच्या मुद्द्यावर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले आहेत की यावेळी मोठ्या क्रूरतेने उत्तर दिले जाईल.

Continues below advertisement

Ahmed Sharif Chaudhry on India Pakistan Conflicts:  भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीच्या निर्णयानंतर पाकड्यांनी आपली सफशेल हार पत्करली आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी देखील भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार असल्याचं विधान केलं आहे. मात्र असे असताना पाकिस्तानी (India Vs Pakistan) लष्कराकडून पुन्हा त्याच त्या वल्गना करणं सुरू आहे. पहेलगाम येथील भ्याड हल्ल्याला आणि दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केले होते. यात पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर पाकिस्तानने आक्रमक भूमिका स्वीकारली आणि दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. मात्र भारताच्या लष्करी कारवाई नंतर पाकिस्तान पुरता वठणीवर आला आहे. अशातच आता पुन्हा पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला धमकी दिली आहे.

Continues below advertisement

अहमद शरीफ चौधरी (Ahmed Sharif Chaudhry) यांनी स्काय न्यूजला मुलाखत दिली. यावेळी, युद्धबंदीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, जर भारताने नियम मोडले तर त्याचे प्रत्युत्तर क्रूर असेल. ते म्हणाले, "अमेरिकेसारख्या देशांना भारताला काय करायचे आहे हे माहित आहे. सर्वप्रथम, फाळणीपासून न सुटलेला काश्मीर प्रश्न सोडवला पाहिजे. काश्मीर प्रश्न तेथील जनतेच्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या इच्छेनुसार सोडवला पाहिजे."

देशाच्या अखंडतेशी छेडछाड करेल त्याला योग्य उत्तर

अहमद शरीफ चौधरी म्हणाले, "जो कोणी आपल्या सीमेत घुसून देशाच्या अखंडतेशी छेडछाड करेल त्याला योग्य उत्तर दिले जाईल आणि ते अत्यंत क्रूर असेल." चौधरी यांच्या आधी अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या नेत्यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे.

भारताने दिला पाकिस्तानला मोठा धक्का

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला. त्यात अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानने भारतीय शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रत्येक हल्ला अयशस्वी झाला. भारताने प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. त्याने स्वतःही हे मान्य केले. यानंतरही पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच राहिले. भारतीय सैन्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दहशतवाद्यांना ठार मारले असून अजूनही या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे म्हणणे काय?

अशातच, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार असल्याचं विधान केलं आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुडघे टेकले आहेत. याचदरम्यान पाकिस्तानचे पतंप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, पाकिस्तान शांततेसाठी भारतासोबत चर्चा करण्यास तयार आहे, असं शाहबाज शरीफ म्हणाले. तर जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही, असं भारताने ठणकावले आहे. 

हे ही वाचा 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »