Wardha Crime : नवऱ्यानं मारलं, पत्नीच्या भावनांचा कडेलोट, रागात दीड वर्षाच्या लेकीला घेऊन केलं थरकाप उडवणारं कृत्य; टोकाच्या निर्णयानं वर्धा सुन्न!
Wardha Crime : नवऱ्यानं मारलं, पत्नीच्या भावनांचा कडेलोट, रागात दीड वर्षाच्या लेकीला घेऊन केलं थरकाप उडवणारं कृत्य; टोकाच्या निर्णयानं वर्धा सुन्न!

Wardha Crime : शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास पतीने सांगितले. मात्र पत्नीने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने विवाहितेला मारहाण केली. याच रागातून संतप्त विवाहितेने पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेत लगतच्या शेतातीलच विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना हिंगणघाट तालुक्याच्या फुकटा गावात घडली. आई शशिकला पिंटू घुले (वय 24) तर दिड वर्षाची कविता पिंटू घुले अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आईची दीड वर्षाच्या लेकीसह विहिरीत उडी घेत आत्महत्या
अधिकची माहिती अशी की, शेतात चरण्यासाठी सोडलेल्या मेंढ्या परत घेऊन ये, असं पिंटू घुले या पतीने त्याची पत्नी शशिकला घुले हिला सांगितले. मात्र, पत्नी शशिकला हिने नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला जबर मारहाण केली. मारहाण झाल्याने पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. शशिकला घुले हिने तिच्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
विहिरीत उडी मारताना तेथील काही नागरिकांना ही बाब दिसली. त्यांनी तत्काळ इतरांना गोळा करत माय लेकीचे मृतदेह विहिरी बाहेर काढले. मृत विवाहितेच्या घरातील नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपासाला सुरवात केली आहे.
- पतीचा राग असह्य; पत्नीची दीड वर्षाच्या मुलींसह आत्महत्या
- विहिरीत उडी घेऊन माय लेकीची आत्महत्या
- हिंगणघाट तालुक्यातील फुकटा येथील घटना
- वडनेर पोलिसात गुन्हा दखल
- फुकटा गावातील घटनेने खळबळ
- विहिरीबाहेर काढले दोघांचेही मृतदेह
Pune Crime : ऐन तारुण्यात जीवनात अंधार, प्रेमभंगानं नैराश्याच्या खाईत लोटलं, बड्या पोलीस ऑफिसरच्या तरण्या पोरानं उचललं टोकाचं पाऊल!https://t.co/4yldk8cKGp
— ABP माझा (@abpmajhatv) February 8, 2025
कर्नाटकमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे. सात वर्षांच्या मुलाच्या गालावर टाके घालण्याऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या नर्सने चक्क फेव्हिक्विकचा वापर केला. #karnatakhttps://t.co/b3a1r0zZeN
— ABP माझा (@abpmajhatv) February 8, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या