TOP 90 : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 24 June 2025
१२ दिवसांच्या युद्धानंतर इराण - इस्रायल युद्धबंदीची घोषणा. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केली घोषणा. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीवर सहमती
युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरही इस्रायलच्या तेल अवीव आणि जेरूसलेममध्ये पुन्हा स्फोट. हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरनही कार्यान्वित. मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये स्फोटांचे आवाज
इराणने कतारद्वारे अमेरिकेला युद्धबंदीचा संदेश पाठवला. इराणच्या संदेशाला अमेरिकेने दिलं उत्तर. इराणविरुद्ध लष्करी कारवाई करणार नसल्याची अमेरिकेची घोषणा.
भारताचं ऑपरेशन सिंधू, इराणच्या मशहादमधून २९० भारतीय आणि १ श्रीलंकेचा नागरिक दिल्लीत दाखल.
मुंबई आणि उपनगरात पावसाची उघडझाप, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने
भिवंडीत काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, भाजी मार्केट, बाजारपेठ, खाडीपार ,तीनबत्ती परिसरात पाणी अनेक नागरिकांच्या घरातही शिरलं पाणी, पावसाने कामवारी नदी ने ओलांडली धोक्याची पातळी.
वसई, विरार, नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस, नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर मधील सर्कलवर सकाळीही रस्त्यावर पाणी, विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून काढावी लागली वाट.
अलिबादला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपलं, पावसाने गोंधळपाडा, बुरुमखान परिसरातील मुख्य रस्त्यावर दोन भली मोठी चिंचेची झाडं पडली, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद.





महत्त्वाच्या बातम्या
