मी गावी आलो की इकडचं टेम्प्रेचर कमी होतं आणि मुंबईत वाढतं, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
मी गावाला आलो की इकडे टेम्प्रेचर (Temperature) कमी होतं आणि मुंबईत वाढतं असे वक्तव्य करत राज्याचे उपमुख्यमंत्रपी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांना टोला लगावला.

Eknath Shinde : राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले महाबळेश्वरला (Mahabaleshwar) आले की टेम्प्रेचर कमी होतं. पण मी गावाला आलो की इकडे टेम्प्रेचर (Temperature) कमी होतं आणि मुंबईत वाढतं असे वक्तव्य करत राज्याचे उपमुख्यमंत्रपी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांना टोला लगावला. विरोधक याच्या बातम्या करतात, मी मात्र याचा आनंद घेतो. आता पाहिलं असेल की मी इकडे का येतो. निसर्ग आहे इकडे अस एकनाथ शिंदे म्हणाले.
आपण आपला ठेवा जपण्याचे काम केलं आहे
स्थानिक लोकांना इथेच रोजगार मिळावा अशा प्रकारची भूमिका आपल्या सरकारची आहे. महापर्यटन महोत्सव पर्यटनाला चालना देईल असेही एकनाथ शिंदे म्हणाले. इकडचे वातावरण आगळे वेगळे आहे. मी कालपासून अनेक स्टॉलला भेट दिली आहे. सगळ्या ठिकाणची चव आहे. एखाद्याच्या मागे सरकार उभे राहिल्यावर काय होऊ शकते याची प्रचिती आली आहे. पुन्हा कधी होणार याचे उत्तर मुख्यमंत्री देतील. हा महोत्सव यशाकडे जातो आहे. आम्ही सगळ्या योजनांना प्राधान्य दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आपण आपला ठेवा जपण्याचे काम केलं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासचा रथ उधळत आहे. शंभूराज काळजी करू नका , तुम्ही केलेलं काम मधाचे काम आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं, त्यांच्या कुशीत वसलं माझं गाव दरं
महाबळेश्वरमध्ये 80 टक्के स्ट्रॉबेरीचे उत्पादन होते. जे जे वांछील ते तो लावो असा म्हणता येईल. अशा प्रकारचा फेस्टिवल पहिल्यांदाच पाहिला आहे. मी वेळ काढून गावी येतो आणि 2000 झाड लावतो. मी बांबूची लागवड करतो. बांबू कुठे लावतात हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे असेही शिंदे म्हणाले. आपण गट शेती केली पाहिजे. कमी खर्चात जात उत्पादना घेतलं पाहिजे. मी म्हणतो लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं, त्यांच्या कुशीत वसलं माझं गाव दरं असेही एकनाथ शिंदे म्हणाले. पर्यटकांनं सुरक्षित वाटावं यासाठी दल स्थापन केलं आहे. ब्रिटिशानंतर महाबळेश्वर पर्यटन स्थळ विकसित करणार आपले सरकार असणार आहे. आजचा पर्यटन महोत्सव यशस्वी होत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आज महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सव 2025 समारोप सोहळा आयोजीत केला होता. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
Nana Patekar : एकनाथ शिंदे असे मित्र, ज्यांच्यावर एकही डाग नाही; नाना पाटेकरांकडून शिंदेंचे तोंड भरून कौतुक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
