Ramraje Naik Nimbalkar : फलटणमध्ये भावांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड, रामराजे निंबाळकरांनी सोशल मीडियाला स्टेटस, म्हणाले, काळजी नसावी!
Ramraje Naik Nimbalkar : फलटणमध्ये भावांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडल्याने रामराजे निंबाळकरांनी सोशल मीडियाला स्टेटस ठेवत कार्यकर्त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केलं आहे.

सातारा: शरद पवारांच्या पक्षातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच आज (5 फेब्रुवारी) माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंधूच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar), रघुनाथराजे नाईक निंबाळकर (Raghunath Raje Naik Nimbalkar) यांच्या घरावर सकाळी आयकर विभागानं छापा टाकाला आहे. मात्र ही धाड नेमकी कशामुळे आणि धाडीचे कारण काय? हे अद्याप कळू शकलेले नाही.
दरम्यान, या प्रकरणावर आता स्वत: रघुनाथराजे निंबाळकर यांनी 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देत या कारवाईवर भाष्य केलं आहे. आम्ही कुठल्याही चोऱ्यामाऱ्या केल्या नाहीत. दोन नंबरचे धंदे केले नाहीत. त्यामुळे यामधून काही निष्पन्न होणार नाही, असा विश्वास रघुनाथराजे निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे रामराजे निंबाळकरांनी (Ramraje Naik Nimbalkar) सोशल मीडियाला स्टेटस ठेवत कार्यकर्त्यांना काळजी करण्याचे कुठलेही कारण नसून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केलं आहे.
'कृपया घरा बाहेर गर्दी करू नका, खात्याला आपले काम करू द्या- रामराजे निंबाळकर
रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या पक्षात आहेत. तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती केलेली कारवाई राजकीय द्वेशातून असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आज (5 फेब्रुवारी) सकाळी सहा वाजता आयकर विभागाचा छापा संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती पडला आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी सकाळपासूनच त्यांच्या घराबाहेर केली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी ही तबडा बंदोबस्त घरा बाहेर तैनात केला आहे. अशातच 'कृपया घरा बाहेर गर्दी करू नका, खात्याला आपले काम करू द्या, काळजी नसावी' अशी पोस्ट करत रामराजे निंबाळकरांनी (Ramraje Naik Nimbalkar) कार्यकर्त्यांना शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

