मोठी बातमी! वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; मोदींच्या बैठकीतून पाकवर स्ट्राईक
पराराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर माहिती दिली.

नवी दिल्ली: पहलगाम येथील दहशतवादी (Terrror) हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra modi) निवासस्थानी सीसीएस म्हणजे कॅबिनेट सुरक्षा सेक्युरिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काश्मीरमधील दहशवाद आणि पाकिस्तान या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली असून 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील या बैठकीला हजर होते. या बैठकीत वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेऊन घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानुसार, पाकिस्तानची (Pakistan) पूर्णत: कोंडी करण्यात आली आहे.
लष्कर आणि संबंधित विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांना पूर्ण ब्रिफिंग करण्यात आले. त्यानंतर, अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पराराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर माहिती दिली. त्यानुसार, पाकिस्ताविरोधात 5 मोठे निर्णय घेत 5 तगडे धक्के पाकिस्तानला देण्यात आले आहेत. पुढील 48 तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द करण्यात येत आहे. तसेच, भारतातील पाकिस्तान दुतावासाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची व्यापाराच्या दृष्टीने कोंडी करण्याची रणनीती भारताने आखली असून आजच्या बैठकीतील निर्णयाचा दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर होणार आहे.
बैठकीतील 5 मोठे निर्णय, 5 तगडे धक्के
1- पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात
2- 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा
3- सिंधू जल करार स्थगित
4- अटारी बॉर्डर बंद
5- पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misry says, "The Defence/Military, Naval and Air Advisors in the Pakistani High Commission in New Delhi are declared Persona Non Grata. They have a week to leave India. India will be withdrawing its own Defence/Navy/Air Advisors from the… https://t.co/qGEQUfHwlZ pic.twitter.com/yziqd7PLtI
— ANI (@ANI) April 23, 2025
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल
हेही वाचा
दैव बलवत्तर... अकोल्यातील विशाल अन् पत्नीचा जीव वाचला, पहलगामचा दौरा एक दिवस आधीच उरकला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
