एक्स्प्लोर

Pune Crime: लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं

Pune Crime: पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये तरूणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज नावाच्या लॉजमध्ये हा प्रकार घडला आहे. नितेश नरेश मिनेकर असं आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तविला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश मिनेकर हा आपल्या प्रेयसी सोबत लॉजमध्ये जात असतानाची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. लॉजमध्ये गेल्यानंतर काही वेळाने नितेश मिरेकर याने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. संबधित घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! 

कोरेगाव पार्क परिसरात  गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना समोर आली आहे, यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मध्यरात्री 01.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलिशान कारने MH12 NE 4464 पहिल्यांदा एक्टिवावरील तिघांना धडक दिली.या घटनेमध्ये ते तिघे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पुढे एक्सेस गाडीवरून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने चालक रौफ अकबर शेख गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना नोबल हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक दारुच्या नशेत असल्याची प्रथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघात झाल्यावर चालक भरधाव वेगात कार घेऊन पळून गेला. या अपघातात रौफ अकबर शेख या दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला आहे. या आलिशान कारच्या चालकाने २ दुचाकींना धडक दिली यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कोर्टात आणलं
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कोर्टात आणलं
Anil Gote on Arjun Khotkar : मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा; अनिल गोटेंचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज
मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा; अनिल गोटेंचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज
मेकअप करून झोपायचं, दिवसातून तीनदा अंघोळ अन् लग्न करून 15 दिवसात फरार व्हायची; तब्बल 25 लग्न करणारी 'दरोडेखोर दुल्हन' अखेर सापडली!
मेकअप करून झोपायचं, दिवसातून तीनदा अंघोळ अन् लग्न करून 15 दिवसात फरार व्हायची; तब्बल 25 लग्न करणारी 'दरोडेखोर दुल्हन' अखेर सापडली!
Arjun Khotkar : खोतकरांच्या पीएच्या रूमध्ये सापडलं कोट्यवधींचे घबाड; खुद्द अर्जुन खोतकरांची प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; अनिल गोटेंचे 'ते' खळबळजनक आरोप फेटाळले
खोतकरांच्या पीएच्या रूमध्ये सापडलं कोट्यवधींचे घबाड; खुद्द अर्जुन खोतकरांची प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; अनिल गोटेंचे 'ते' खळबळजनक आरोप फेटाळले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Khotkar on Dhule Money : अनिल गोटे यांचे आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळलेVaishnavi Hagawane Case : ना हगवणे, ना कस्पटे, वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ कुणाकडे? Kaspate FamilyDhule Police Raid News : ज्या रुममध्ये कोट्यवधी रुपये सापडलं 'ती' रुम अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकांच्या नावे होती?ABP Majha Headlines : 10 AM : 22 May 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कोर्टात आणलं
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कोर्टात आणलं
Anil Gote on Arjun Khotkar : मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा; अनिल गोटेंचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज
मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा; अनिल गोटेंचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज
मेकअप करून झोपायचं, दिवसातून तीनदा अंघोळ अन् लग्न करून 15 दिवसात फरार व्हायची; तब्बल 25 लग्न करणारी 'दरोडेखोर दुल्हन' अखेर सापडली!
मेकअप करून झोपायचं, दिवसातून तीनदा अंघोळ अन् लग्न करून 15 दिवसात फरार व्हायची; तब्बल 25 लग्न करणारी 'दरोडेखोर दुल्हन' अखेर सापडली!
Arjun Khotkar : खोतकरांच्या पीएच्या रूमध्ये सापडलं कोट्यवधींचे घबाड; खुद्द अर्जुन खोतकरांची प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; अनिल गोटेंचे 'ते' खळबळजनक आरोप फेटाळले
खोतकरांच्या पीएच्या रूमध्ये सापडलं कोट्यवधींचे घबाड; खुद्द अर्जुन खोतकरांची प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; अनिल गोटेंचे 'ते' खळबळजनक आरोप फेटाळले
Donald Trump : लाईट बंद करा अन् लाव रे तो व्हिडिओ! व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणखी एका राष्ट्राध्यक्षांना भिडले; राष्ट्राध्यक्ष म्हणाले, मला माफ करा, माझ्याकडे तुम्हाला भेट देण्यासाठी विमान नाही
लाईट बंद करा अन् लाव रे तो व्हिडिओ! व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणखी एका राष्ट्राध्यक्षांना भिडले; राष्ट्राध्यक्ष म्हणाले, मला माफ करा, माझ्याकडे तुम्हाला भेट देण्यासाठी विमान नाही
Washington Firing : अमेरिकेत ज्यू संग्रहालयाबाहेर गोळीबार, इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अमेरिकेचा टार्गेट किलिंगचा आरोप
अमेरिकेत ज्यू संग्रहालयाबाहेर गोळीबार, इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अमेरिकेचा टार्गेट किलिंगचा आरोप
एखाद्याच्या विचारसरणीसाठी जेलमध्ये टाकू शकत नाही, आम्ही ही प्रवृत्ती पाहत आहोत; न्यायालयाची 'सर्वोच्च' टिप्पणी
एखाद्याच्या विचारसरणीसाठी जेलमध्ये टाकू शकत नाही, आम्ही ही प्रवृत्ती पाहत आहोत; न्यायालयाची 'सर्वोच्च' टिप्पणी
Dhule News : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...
धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...
Embed widget
OSZAR »