Medha Kulkarni: मेधा कुलकर्णींनी भाजपच्या नेत्यावरच केले गंभीर आरोप, 127 कोटींच्या घोटाळा समोर आणण्यासाठी अमित शाहांची घेणार मदत
Medha Kulkarni: भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शेखर चरेगावकर यांच्यावर केल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

पुणे : भाजपचे नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. यशवंत नागरी सहकारी बँकेच्या 140 कोटींच्या कर्जांपैकी तब्बल 127 कोटींचे कर्ज बनावट संस्थांच्या नावावर उचलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांच्यावर यापूर्वीच गुन्हाही दाखल आहे. याप्रकरणानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी चरेगावकर यांच्यावरती आरोप केला आहे. त्यामुळे आता भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यावर केल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
कराड येथील यशवंत सहकारी बँकेत दीडशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झालेले चरेगावकर हे देखील भाजपशी संबंधित आहेत. ते राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष असून, एका ज्येष्ठ मंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी त्यांच्यावरती झालेले आरोप फेटाळले आहेत.
मेधा कुलकर्णींनी पत्रकार परिषदेत केलं भाष्य
‘यशवंत सहकारी बँकेत दीडशे कोटींचा घोटाळा झाला असून, त्यामध्ये शेखर चरेगावकर यांचा मुख्य सहभाग आहे. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेक लोकांची फसवणूक केली आहे, लेखापरीक्षण अहवालातही घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे या घोटाळ्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत चौकशी करून शेखर चरेगावकर यांच्यासह दोषी संचालकांना अटक करावी,’ अशी मागणी खासदार कुलकर्णी यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली होती.
‘बँकेच्या 230 कोटींच्या ठेवी आहेत. मात्र, गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत आलेल्या आहेत. बँकेतील आर्थिक अनियमिततेबाबत तीन अहवाल आले आहेत. या संदर्भात माझ्या संपर्कात असलेल्या ठेवीदारांना शेखर चरेगावकर यांचे बंधू शार्दूल यांच्याकडून धमकावले जात आहे. सहकार खात्यातील अधिकाऱ्यांवरही कारवाई न करण्यासाठी दबाव टाकला जात आहे,’ असे मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. ‘मलाही ‘या प्रकरणात गप्प बसा, अन्यथा तुमचे गेल्या वेळी तिकीट कापले, तसे पुढेही पाहून घेऊ,’ अशी धमकी दिली गेली,’ असा आरोप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्याने या सर्व प्रकरणाची सध्या चर्च सुरू झाली आहे.
कुलकर्णी यांनी कराडमध्येही गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन चरेगावकर यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर चरेगावकर यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन कुलकर्णी यांचे सर्व आरोप फेटाळले होते. तसेच, कोणत्याही चौकशीला सामारे जाण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले होते.
नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर 127 कोटी रुपयांचे कर्ज
मेधा कुलकर्णी यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टी मांडल्या आहेत.त्या म्हणाल्या, यशवंत सहकारी बँकेत मोठा घोटाळा झाला आहे. फलटणच्या यशवंत सहकारी बँकेत हा सगळा घोटाळा झाला आहे. अनेकांच्या नावावर खोटे कर्ज दाखवले गेले आहेत. अनेक ठेवीदार मला भेटत आहेत. ठेवीदारांच्या 25-25 वर्षापासून ठेवी आहेत, त्या बँकेमध्ये आता त्या पैशांची हमी नाही. त्यांना सांगितलं जात आहेत की रक्कम डिव्हाईड करून दाखवा. पैसे मिळवण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत याला कारण काय आहे. शेखर चारेगावकर यांनी हा घोटाळा केला आहे. भाजपच्या पदाचा आणि बँकेच्या पदाचा गैरवापर करून घोटाळा करत अनेकनाचे पैसे बुडवले आहे, बँक आता बुडीत झाली आहे. आपल्या नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर 127 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहेत. बनावट कंपन्या बनवत बँकेची फसवणूक करण्यात आली आहे असंही कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
बँकेचे 90 टक्के कर्ज हे शेखर चरेगावकर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत. नागरिक, सरकार आणि RBI ला चारेगावकर आणि बँकेच्या संचालक मंडळाने फसवलं आहे. या सगळ्यांची चौकशी करा. अध्यक्ष आणि इतरांची संपूर्ण मालमत्ता जप्त करून पैसे द्या. याची CBI मार्फत चौकशी व्हावी. समिती नेमून चौकशी करावी. पोलिस कारवाई व्हावी ही विनंती आहे. लोकांना खोटे जमीनदार दाखवून हे पैसे लाटले गेले आहेत, लोकांच्या खोट्या सह्या करण्यात आल्या आहेत, खोटे कर्ज घेतले गेले याची चौकशी व्हावी. खोट्या कर्ज प्रकरणामुळे एकाने आत्महत्या देखील केली आहे. ठेवी एकूण 230 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. 150 कोटी रुपयांचा एकूण घोटाळा झाला आहे. 120 पेक्षा अधिक ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. अनेक लोकांना दम कोणाचा प्रयत्न झाला. मलाही धमकी आली आहे. अमित शाह यांनी आम्हाला सांगितल आहे, की यात CBI कडून चौकशी करू. आम्हाला अधिकारी सांगत आहेत की प्रकरण दाबलं जात आहे, वरून दबाव आणला जात आहे, असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
