ट्रेंडिंग
Ajit Pawar: 'मी विषय वाढवणार नव्हते...', अजित पवारांच्या उद्घाटनाच्या 'घाई'वर मेधा कुलकर्णी स्पष्टच बोलल्या, सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास नेमकं काय घडलं?
Ajit Pawar: मी विषय वाढवणार नव्हते. तुम्ही आला म्हणून सांगते. 10 मिनीटे लवकर उद्घाटन झालं, नक्कीच मला वाईट वाटतं, असंही त्या म्हणाल्या.
पुणे: आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पहाटेपासून कार्यक्रमांचा धडाका उडवला दिला. परशूराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवार यांनी पहाटे उद्घाटन केलं. पहाटे साडेसहा वाजता या इमारतीच्या उद्धाटनाची नियोजित वेळ ठरलेली होती. मात्र त्याआधीच अजित पवारांनी उद्घाटन केलं होतं. या उद्घाटनासाठी भाजप नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णीही वेळेत उपस्थित राहिल्या, मात्र अजित पवारांनी दहा मिनिटं आधीच उद्घाटन उरकलं होतं. वेळेआधीच कार्यक्रम झाल्याने मेधा कुलकर्णी काहीशा चिडल्याचं दिसून आलं. त्यामुळे अजित पवारांनी पुन्हा एकदा उद्घाटन केलं आणि फोटो काढले. आज या घटनेची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या घटनेबाबत बोलताना मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं की, मी विषय वाढवणार नव्हते. तुम्ही आला म्हणून सांगते. 10 मिनीटे लवकर उद्घाटन झालं, नक्कीच मला वाईट वाटतं. माझी विनंती आहे, दादांना रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या. पण एक वेळ घोषित करा. प्रोटोकॉल नुसार ज्यांना ज्यांना आमंत्रण होतं, तिथे सगळेच येणार होते. बस किंवा फ्लाईट आपण ज्यासाठी पकडण्यासाठी जातो तेच आधी निघून गेलं तर वाईट वाटणारच ना. जी वेळ घोषित केली आहे त्याआधी उद्घाटन करू नये. मी आधी 10 मिनीटे पोहचले होते, दादा यांनी 20 मिनीटे आधीच उद्घाटन केलेले होते. पुण्यात मी एकच ब्राम्हण खासदार आहे आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ यासाठी नक्की काम करेल. आमचे तिन्ही नेते जास्त जास्त काम करतात ते आमचे आदर्श आहेत. अजित दादा यांनी वेळेच्या पूर्वी उद्घाटन करू नये एवढीच विनंती आहे असंही पुढे मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
मेधा कुलकर्णी : (हातातील मोबाईलवर वेळ दाखवत) सहा चोवीसच झालेत
अजित पवार : अहो मला काय माहिती तुम्ही येणार आहात
मेधा कुलकर्णी : मी येणार नाही? परशूराम आर्थिक विकास महामंडळ आहे, कधी नव्हे ते झालंय...
मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीनंतर अजित पवार यांनी लगेच पुन्हा एकदा परशूराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीच्या उद्धाटनाची औपचारिकता पार पाडली.
अजितदादांनी भाजप खासदार पोहोचण्याआधीच उद्घाटन उरकलं
खासदार मेधा कुलकर्णी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्या, त्यावेळी मेधा कुलकर्णी यांनी त्यांना सकाळी 6.30 च्या आधी उद्घाटन केलं दादा असं म्हटलं. त्यावर अजित पवारांनी मला माहिती नव्हतं, परत उद्घाटन करू असं म्हटलं. यानंतर अजित पवारांच्या उत्तरावर मेधा कुलकर्णींनी असं कसं म्हटलं. यानंतर पुन्हा अजित पवार यांनी इमारतीचे उद्घाटन केलं.