Dhananjay Munde : सार्वजनिक कार्यक्रमापासून दोन हात दूर असलेले धनंजय मुंडे पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; परळीत महाराष्ट्र दिनी केलं ध्वजवंदन

Dhananjay Munde : गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे हे प्रकृती अस्वस्थ असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नव्हते.

Continues below advertisement

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर (Santosh Deshmukh Murder Case) राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि विविध ठिकाणी आंदोलने छेडली गेली. या घटनेनंतर बीडमधील वाढती गुन्हेगारी व दहशतीचं वातावरण चर्चेचा विषय ठरलं. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह (Walmik Karad) सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेतला गेला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर मारहाणीचे धक्कादायक फोटो समोर आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. मुंडे यांनी राजीनामा देताना, आपण प्रकृती अस्वस्थ असल्याने मंत्रिपद सोडत असल्याचं कारण दिलं होतं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हते. मात्र, आज (दि. 1 मे) महाराष्ट्र दिनानिमित्त परळी तहसील कार्यालयात झालेल्या ध्वजवंदन सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली.  

Continues below advertisement

परळीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन 

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने परळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आज माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले धनंजय मुंडे आज या सोहळ्यास खास उपस्थित राहिले. सकाळी ठीक 8 वाजून 5 मिनिटांनी ध्वजवंदन करण्यात आले. या प्रसंगी परळी तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जालना येथे पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन

जालना येथे राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा पार पडला. या सोहळ्याला खासदार डॉ. कल्याण काळे आणि आमदार अर्जुन खोतकर यांची उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस महासंचालक पदक प्राप्त पोलिसांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

आणखी वाचा 

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने पूर्ण, मंत्रालयातील पाटी निघेना, कार्यालयही रिक्त; चर्चा तर होणारच

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »