एक्स्प्लोर

दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन, विदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळात ठाकरेंच्या खासदारालाही स्थान; काय म्हणाले केंद्रीयमंत्री

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काल उद्धव ठाकरे जी यांच्याशी या शिष्टमंडळासंदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला.

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आणि सैन्य दलाच्या (indian army) कारवाईसंदर्भात जगभरातील विविध देशांत जाऊन सत्यता व माहिती देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यासाठी, सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार करण्यात आले असून शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग झाला आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून एकाही खासदाराचा सहभाग या शिष्टमंडळात करण्यात आला नव्हता. त्यावरुन, खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. संसदेतील आपल्या खासदारांचं संख्याबळ सांगत त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षात भेदभाव केल्याचेही म्हटले होते. त्यानंतर, आता केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन करुन सर्वपक्षीय शिष्टमंडळ संदर्भात माहिती दिली. तसेच, या शिष्टमंडळात शिवसेना युबीटी पक्षाच्या खासदाराचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.  

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काल उद्धव ठाकरे जी यांच्याशी या शिष्टमंडळासंदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला. देशाचे हे शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध आहे आणि याची खात्री मिळाल्यावर, आम्ही सरकारला आश्वासन दिले आहे की आम्ही या शिष्टमंडळाद्वारे आपल्या देशासाठी जे योग्य आणि आवश्यक ते करू इच्छितो. त्यानुसार, खासदार प्रियंका चतुर्वेदी देशभरातील इतर खासदारांसह या शिष्टमंडळाचा भाग असतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, या शिष्टमंडळात शिवसेना युबीटीकडून खा. प्रियंका चतुर्वेदी यांची वर्णी लागली आहे. 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत विशेषतः पाक-आधारित दहशतवादाविरुद्ध आणि त्यांचे तळ नष्ट करण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला आहे. दहशतवादाविरुद्ध कारवाई करणाऱ्या सशस्त्र दलांमध्ये आपण सर्वजण एक आहोत, याबद्दल कोणतेही दुटप्पी मत असू नये. पहलगामवरील राजनैतिक परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर/सुरक्षा यंत्रणेबद्दल आपले मत आहे आणि आम्ही आपल्या देशाच्या, आपल्या देशाच्या हितासाठी प्रश्न विचारत राहू. तथापि, पाकिस्तान आधारित दहशतवादाला एकाकी पाडण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आले पाहिजे. आम्ही केंद्र सरकारला असेही कळवले आहे की या कारणासाठी आम्ही एकत्र असलो तरी, गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी या प्रतिनिधीमंडळांबद्दल पक्षांना चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा एक नियम पाळला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

राष्ट्रीय हिताच्या कृतीला आमचा पाठिंबा

कालच कॉलद्वारे आम्ही राष्ट्रीय हिताच्या अशा कोणत्याही कृतीला आमचा पाठिंबा पुन्हा जाहीर केला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर या विषयावर लवकरात लवकर चर्चा करण्यासाठी आणि यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 

हेही वाचा

ह्या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच...; मंत्रि‍पदाची शपथ घेताच छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर थेट हल्लाबोल

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shashi Tharoor : ... तर, पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल, काँग्रेस खासदार शशी थरुर यांचा अमेरिकेतून इशारा
पाकिस्तानला घरात घुसून मारलंय, यापुढं पाकला मोठी किंमत चुकवावी लागेल, शशी थरुर यांचा इशारा
Indian Economy : पाच ट्रिलियन इकॉनॉमीकडे दमदार वाटचाल, जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था
पाच ट्रिलियन इकॉनॉमीकडे दमदार वाटचाल, जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था
IPL 2025 Top-2 Playoffs Scenarios : पराभवामुळे 'प्रिन्स'चा डाव फिस्कटला! जर आता असे झाले तर मुंबई अन् आरसीबीची बल्ले बल्ले, समजून घ्या टॉप-2 चे समीकरण
पराभवामुळे 'प्रिन्स'चा डाव फिस्कटला! जर आता असे झाले तर मुंबई अन् आरसीबीची बल्ले बल्ले, समजून घ्या टॉप-2 चे समीकरण
Latur Accident : अंगणात खेळणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीला ट्रॅक्टरने चिरडले, लातूरमधील घटना, कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
अंगणात खेळणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीला ट्रॅक्टरने चिरडले, लातूरमधील घटना, कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Indian economy Special Report | भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकलेBJP Mumbai | भाजपची भेंडी बाजार ते क्रॉफर्ड मार्केटदरम्यान Tiranga Rally, मुस्लिम समाजाचा मोठा सहभागPooja Khedkar Exclusive : पूजा खेडकरनं महागड्या गाड्या कश्या खरेदी केल्या?Andheri Police Camp : पोलीस कॅम्पमधील एका इमारतीचा स्लॅब कोसळला,नागरिकांमध्ये भीती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shashi Tharoor : ... तर, पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल, काँग्रेस खासदार शशी थरुर यांचा अमेरिकेतून इशारा
पाकिस्तानला घरात घुसून मारलंय, यापुढं पाकला मोठी किंमत चुकवावी लागेल, शशी थरुर यांचा इशारा
Indian Economy : पाच ट्रिलियन इकॉनॉमीकडे दमदार वाटचाल, जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था
पाच ट्रिलियन इकॉनॉमीकडे दमदार वाटचाल, जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था
IPL 2025 Top-2 Playoffs Scenarios : पराभवामुळे 'प्रिन्स'चा डाव फिस्कटला! जर आता असे झाले तर मुंबई अन् आरसीबीची बल्ले बल्ले, समजून घ्या टॉप-2 चे समीकरण
पराभवामुळे 'प्रिन्स'चा डाव फिस्कटला! जर आता असे झाले तर मुंबई अन् आरसीबीची बल्ले बल्ले, समजून घ्या टॉप-2 चे समीकरण
Latur Accident : अंगणात खेळणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीला ट्रॅक्टरने चिरडले, लातूरमधील घटना, कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
अंगणात खेळणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीला ट्रॅक्टरने चिरडले, लातूरमधील घटना, कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
लवकरच मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, कृषी विभागाचं आवाहन
लवकरच मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, कृषी विभागाचं आवाहन
Russia Ukraine War : यूक्रेनचा व्लादिमीर पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला, झेलेंस्की यांचा आदेश होता, रशियाचा सर्वात मोठा दावा
यूक्रेनचा व्लादिमीर पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला, रशियाचा सर्वात मोठा दावा
ST Bus : एसटीला इलेक्ट्रिक बस वेळेवर न पुरविणाऱ्या कंपनीवर कारवाई नाही, व्यवस्थापनावर कुणाचा दबाव? श्रीरंग बरगे यांचा सवाल
एसटीला इलेक्ट्रिक बस वेळेवर न पुरविणाऱ्या कंपनीवर कारवाई नाही, व्यवस्थापनावर कुणाचा दबाव? श्रीरंग बरगे यांचा सवाल
IPO Update: पैसे तयार ठेवा, शेअर बाजारात धमाका होणार, येत्या आठवड्यात आयपीओची रांग, जाणून घ्या सविस्तर माहिती
पैसे तयार ठेवा, शेअर बाजारात धमाका होणार, येत्या आठवड्यात आयपीओची रांग, जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget
OSZAR »