एक्स्प्लोर

Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

Nashik Politics : शिंदे गटाने काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला. नाशिकच्या बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

नाशिक  : काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला धक्का दिला होता. शुक्रवारी शिंदे गटाने काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला. काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी खा. नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय करंजकर, उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, योगेश म्हस्के, संजय तुंगार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने चांगली कामगिरी करत क्रमांक दोनचा पक्ष बनला आहे. शिंदेसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद आले नसले तरी त्यांच्या पक्षाकडे इनकमिंग वाढू लागली आहे. नाशिकमध्ये शिंदेसेना वर्चस्व वाढवण्यासाठी कामाला लागली असून, ठाकरे गटासोबतच इतर पक्षांतील माजी नगरसेवकांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे पुढच्या काही शिंदेसेनेत आणखी प्रवेश होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात इनकमिंग सुरू झाली आहे. 

शिंदेंचा काँग्रेस, राष्ट्रवादीला दे धक्का

शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा नुकताच शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य सत्कार केला असता यावेळी त्यांनी शहर व जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रवेश द्यावे लागणार आहेत. मात्र, निष्ठावानांना विचारात घेऊनच प्रवेश दिले जातील, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानाची शिंदेसेनेत चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान, जॉय कांबळे हे काँग्रेसचे दिवंगत नेते माजी नगरसेवक उत्तम कांचळे यांचे सुपुत्र असून, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड, विसे मळा या परिसरातून ते निवडून येतात. त्यांच्या शिंदे प्रवेशाने काँग्रेसला धक्का बसला आहे. तर राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे या उपनगरमधून गेल्या वेळेस निवडून आल्या होत्या, त्यांनीही कांबळे यांच्या सोबत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेची लाट : अजय बोरस्ते 

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची लाट आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी लोकाभिमुख केलेली कामे, घेतलेले निर्णय सर्वांना भावले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षातील पदाधिकाऱ्याला  वाटते आहे की, आपण सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे. केवळ उबाठाच नव्हे तर तर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांतील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहेत. या प्रवेशाने त्याचा श्रीगणेशा झाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली आहे. 

आणखी वाचा 

Ajit Pawar on Sharad Pawar: "साहेबांच्यानंतर बारामती अजितदादाच्या मागे"; अजित पवारांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या, नेमकं म्हणाले काय?

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Terror Attack : माहेर पाकिस्तानात अन् सासर भारतात, 25 वर्षांपासून सहा महिलांचं नाशिकमध्ये वास्तव्य; पाकड्यांना चले जावचे आदेश दिल्यानंतर सुनांपुढे पेच, पुढे काय होणार?
माहेर पाकिस्तानात अन् सासर भारतात, 25 वर्षांपासून सहा महिलांचं नाशिकमध्ये वास्तव्य; पाकड्यांना चले जावचे आदेश दिल्यानंतर सुनांपुढे पेच, पुढे काय होणार?
Video : भारताला पोकळ धमक्या देत सुटलेल्या पाकिस्तानात सैनिकांचा मुडदा पडण्याची मालिका सुरुच; बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 10 सैनिक ठार
Video : भारताला पोकळ धमक्या देत सुटलेल्या पाकिस्तानात सैनिकांचा मुडदा पडण्याची मालिका सुरुच; बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 10 सैनिक ठार
Jammu & Kashmir : पाककडून पुन्हा नापाक षडयंत्र, पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी पंडित-रेल्वे संपत्ती निशाण्यावर?, जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी
पाककडून पुन्हा नापाक षडयंत्र, पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी पंडित-रेल्वे संपत्ती निशाण्यावर?, जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी
Video : 'दहशतवाद्यांनी आम्हाला वेगळे होण्यास सांगितले, पण मुस्लिम कुटुंबाने साथ सोडली नाही, नंतर सर्वांनाच मारलं' महाराष्ट्राच्या दीपिकानं सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
Video : 'दहशतवाद्यांनी आम्हाला वेगळे होण्यास सांगितले, पण मुस्लिम कुटुंबाने साथ सोडली नाही, नंतर सर्वांनाच मारलं' महाराष्ट्राच्या दीपिकानं सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pahalgam Attack | पहलगामचा कट लष्कर ए तोयबाच्या पाच कमांडर्सनी रचल्याची माहितीPrabhadevi Elphinstone Bridgeएल्फिन्सटन पूल 2 दिवस सुरु राहणार, बैठकीत तोडगा निघाल्यावर निर्णय होणारABP Majha Headlines 7 AM Maharashtra News Top Headlines 26 April 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्सABP Majha Headlines 6.30 AM Maharashtra News ABP Majha 26 April 2025 सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pahalgam Terror Attack : माहेर पाकिस्तानात अन् सासर भारतात, 25 वर्षांपासून सहा महिलांचं नाशिकमध्ये वास्तव्य; पाकड्यांना चले जावचे आदेश दिल्यानंतर सुनांपुढे पेच, पुढे काय होणार?
माहेर पाकिस्तानात अन् सासर भारतात, 25 वर्षांपासून सहा महिलांचं नाशिकमध्ये वास्तव्य; पाकड्यांना चले जावचे आदेश दिल्यानंतर सुनांपुढे पेच, पुढे काय होणार?
Video : भारताला पोकळ धमक्या देत सुटलेल्या पाकिस्तानात सैनिकांचा मुडदा पडण्याची मालिका सुरुच; बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 10 सैनिक ठार
Video : भारताला पोकळ धमक्या देत सुटलेल्या पाकिस्तानात सैनिकांचा मुडदा पडण्याची मालिका सुरुच; बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 10 सैनिक ठार
Jammu & Kashmir : पाककडून पुन्हा नापाक षडयंत्र, पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी पंडित-रेल्वे संपत्ती निशाण्यावर?, जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी
पाककडून पुन्हा नापाक षडयंत्र, पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी पंडित-रेल्वे संपत्ती निशाण्यावर?, जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी
Video : 'दहशतवाद्यांनी आम्हाला वेगळे होण्यास सांगितले, पण मुस्लिम कुटुंबाने साथ सोडली नाही, नंतर सर्वांनाच मारलं' महाराष्ट्राच्या दीपिकानं सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
Video : 'दहशतवाद्यांनी आम्हाला वेगळे होण्यास सांगितले, पण मुस्लिम कुटुंबाने साथ सोडली नाही, नंतर सर्वांनाच मारलं' महाराष्ट्राच्या दीपिकानं सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
Beed Crime News : 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; पोलिसांसोबत आरोपीचे रिल्स समाज माध्यमावर व्हायरल, पीडित कुटुंबियांचा गंभीर आरोप
बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; पोलिसांसोबत आरोपीचे रिल्स समाज माध्यमावर व्हायरल, आरोपी अद्याप फरार 
Abir Gulaal: फवाद खानच्या सिनेमाला फटका! चित्रपट बॅन तर झाला, मात्र युट्यूबवरुन गाणीही गायब; पहलगाम हल्ल्यानंतर भारतात चित्रपटावर बंदी
फवाद खानच्या सिनेमाला फटका! चित्रपट बॅन तर झाला, मात्र युट्यूबवरुन गाणीही गायब; पहलगाम हल्ल्यानंतर भारतात चित्रपटावर बंदी
Donald Trump On Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चौफेर घेरलं, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली समोर
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चौफेर घेरलं, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली समोर
Astrology : आज नीचभंग राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मेषसह 'या' 5 राशींवर असणार भोलेनाथाची कृपा, प्रगतीचे मार्ग होतील खुले
आज नीचभंग राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मेषसह 'या' 5 राशींवर असणार भोलेनाथाची कृपा, प्रगतीचे मार्ग होतील खुले
Embed widget
OSZAR »