Ashish Ubale : प्रसिद्ध लेखक आणि 'गार्गी'च्या दिग्दर्शकाची नागपुरात आत्महत्या, कर्जामुळे जीवन संपवल्याची व्हॉट्सअॅपवर नोट लिहिली

Ashish Ubale Death : नागपुरातील रामकृष्ण मठामध्ये भावाला भेटायला गेलेल्या आशिष उबाळे यांनी तिथल्या गेस्ट रुममध्ये आत्महत्या केली. 

Continues below advertisement

नागपूर : प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी नागपूरमधील रामकृष्ण मठात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. उबाळे यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आशिष उबाळे हे मूळचे नागपूरचे असून ते महाल परिसरात राहत होते. 

Continues below advertisement

आशिष उबाळे यांचा लहान भाऊ नागपुरातील रामकृष्ण मठामध्ये सेवेकरी म्हणून काम करत होता. त्यांना भेटण्यासाठीच आशिष उबाळे नागपुरात आले होते. रामकृष्ण मठाच्या गेस्ट रूम मध्ये ते मुक्कामी होते. त्यापूर्वी त्यांनी मठामध्ये जेवणही केलं होतं. शनिवारी दुपारी आराम करण्यासाठी गेस्ट रूम मध्ये गेले. त्यानंतर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

शनिवारी सायंकाळी आशिष उबाळे यांचा भाऊ सारंग त्यांना उठवण्यासाठी गेला असता रूम उघडली नाही. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांना मृत आशिष उबाळे यांच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअपवर एक सुसाईड नोट आढळली. त्यामध्ये डोक्यावर प्रचंड कर्ज असल्याचे आत्महत्या केल्याचे नमूद आहे.

Ashish Ubale Marathi Movie : अनेक मालिका आणि चित्रपटांचे दिग्दर्शन

आशिष उबाळे हे मूळचे नागपूरचे असून त्यांनी पुण्यातील एफटीआयमधून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर  नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईमध्ये आले. त्यांनी टीव्हीसाठी गजरा, अग्नी, एका श्वासाचे अंतर, किमयागार, चक्रव्यूह अशा मालिकांचे दिग्दर्शन केलं. त्यानंतर त्यांनी गार्गी, आनंदाचे डोही आणि बाबूरावला पकडा अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. गार्गी हा चित्रपट कार्ल्सबर्ग चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. 

ही बातमी वाचा: 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »