Beed Crime News: पैशाच्या वसुलीसाठी अपहरण करत चटके देण्याची धमकी; बीडच्या पाटोद्यात व्यापाराचे टोकाचं पाऊल, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Beed Crime News: बीडच्या पाटोदा येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात व्यापारी संजय कांकरिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Beed Suicide News) घटना घडली आहे.

Continues below advertisement

Beed Crime News: बीडच्या पाटोदा येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात व्यापारी संजय कांकरिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Beed Suicide News) घटना घडली आहे. यावेळी त्यांच्या गाडीच्या बॅगमध्ये एक सुसाईड नोट आढळली असून यामध्ये दोघा जणांनी व्याजाने दिलेले पैसे परत दे, अन्यथा उचलून नेऊन चटके देण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले आहे.

Continues below advertisement

परिणामी, वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. आता या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात अमृत भोसले आणि दीपक साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघेही फरार आहेत. तर दुसरीकडे या आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. आरोपी अटक न झाल्यास कुटुंबीयांच्या देखील जीवाला धोका असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे.

विद्युत पुरवठा नसताना वीज बिल,  कर्मचाऱ्यांवर कारवाई

बीड तालुक्यातील च-हाटा येथे आठ वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली होती. मात्र वीज जोडणी अभावी आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली. मात्र इमारतीला कोणताही विद्युत पुरवठा नसताना महावितरण कर्मचाऱ्यांनी 90 हजारांचे बिल दिले. आणि हीच बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती. याची दखल घेत महावितरण विभागाने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

बातमी प्रसारित झाल्यानंतर महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती मागवली. ज्यात प्राथमिक आरोग्य केंद्राला विद्युत पुरवठा नसताना देखील विज बिल दिल्याच समोर आले. याची चौकशी केली असता 2023 मध्ये वीज जोडणी झाल्याचं दिसून आले. त्यामुळे त्यावेळेस कार्यरत असणारे इंजिनिअर आणि दोन लाईनमनवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर निलंबन आणि गुन्हे नोंदविले जाणार आहेत. तसेच मीटरचे रीडिंग घेणाऱ्या एजन्सीवर देखील कारवाई केली जाणार असल्याचं महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले आहे.

भरधाव कारमध्ये अर्धनग्न तरुणांच्या हुल्लडबाजीचा, संतापजनक व्हिडिओ व्हायरल

 धाराशिव शहरात भरधाव कारमध्ये अर्धनग्न तरुणांच्या हुल्लडबाजीचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. शहराचा मुख्य मार्ग असलेल्या भानुनगर ते सेंट्रल बिल्डिंग रस्त्यावर चालत्या गाडीत हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करत अशोभनीय वर्तन केले. या तरुणांनी रस्त्यावर विचित्र हावभाव करत कपडे काढून अंगप्रदर्शन केले. विशेष म्हणजे ज्या रस्त्यावर या तरुणांनी टवाळखोरी केली तो रस्ता पोलीस स्थानकाच्या समोरून जातोय. या प्रकारामुळे सार्वजनिक शिस्तीचा आणि नैतिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावरही व्हायरल होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »