ट्रेंडिंग
14 वर्षांच्या मुलीला असह्य वेदना, डॉक्टरांनी पोटातून काढला तब्बल 210 सेमी लांबीचा केसांचा गोळा
Trichobezoar: एका 14 वर्षांच्या मुलीच्या पोटातून 210 सेंटीमीटर लांब ट्रायकोबिझोर (केसांचा गोळा) बाहेर काढण्यात आला आहे.
Trichobezoar: एसएमएस रुग्णालयात एक आगळावेगळा वैद्यकीय प्रकार समोर आला आहे. एका 14 वर्षांच्या मुलीच्या पोटातून 210 सेंटीमीटर लांब ट्रायकोबिझोर (केसांचा गोळा) बाहेर काढण्यात आला आहे. हा केसांचा एक भला मोठा गुंता आहे, जो आतापर्यंतच्या जगातील सर्वात लांब ट्रायकोबिझोरचा विक्रम ठरला आहे.
यापूर्वीचा विक्रम 180 सेंटीमीटर होता. डॉक्टरांच्या मते, हे प्रकरण 'पिका' नावाच्या मानसिक आजाराशी संबंधित आहे, ज्यामध्ये व्यक्ती असामान्य वस्तू खाण्याची सवय अंगीकारतो. या मुलीला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या ऑपरेशन टीममध्ये डॉ. जीवन कांकरिया आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. डॉक्टरांनी पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या मुलांच्या सवयींकडे दक्षतेने लक्ष ठेवावे.
मुलीचा पोटात 210 सेमी लांब केसांचा गोळा
आग्रा जिल्ह्यातील बरारा गावात राहणाऱ्या एका मुलीला लहानपणापासून माती, लाकूड आणि फळ्याचा खडू (चॉक) खाण्याची सवय होती. यामुळे तिच्या पोटात 210 सेंटीमीटर लांब केसांचा गोळा तयार झाला होता. एसएमएस रुग्णालयातील डॉक्टरांनी हा गोळा शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या बाहेर काढून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 14 वर्षांच्या मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी 210 से.मी. लांब ट्रायकोबिझोर म्हणजेच केसांची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली आहे.
जगातील सर्वात लांब ट्रायकोबिझोर
हा आतापर्यंतचा जगातील सर्वात लांब ट्रायकोबिझोर मानला जात आहे. ही मुलगी दहावीत शिकणारी विद्यार्थिनी असून, ती अनेक वर्षांपासून माती, लाकूड, धागा आणि खडू (चॉक) खाण्याच्या सवयीने त्रस्त होती. डॉक्टरांच्या मते, ही समस्या 'पिका' (Pica) नावाच्या मानसिक विकाराशी संबंधित आहे, ज्यामध्ये व्यक्ती अशा वस्तू खातो ज्या खाण्यायोग्य नसतात.
ट्रायकोबिझोर यशस्वीरित्या बाहेर काढला
सतत पोटदुखी आणि उलटीच्या तक्रारीमुळे त्या मुलीला एसएमएस रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता सीटी स्कॅनमध्ये तिच्या पोटात आणि आतड्यांमध्ये एक असामान्य गाठ आढळली. त्यामुळे डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. सर्जरी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जीवन कांकरिया आणि त्यांच्या टीमने सुमारे दोन तास चाललेल्या ऑपरेशनमध्ये ही गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली. विशेष म्हणजे हे संपूर्ण ऑपरेशन रक्त न चढवता करण्यात आले.
रुग्णाची प्रकृती स्थिर
ही केसांची गाठ पोटातून सुरू होऊन थेट लहान आतड्यांपर्यंत पसरलेली होती आणि तिला एका तुकड्यात बाहेर काढणे ही सर्वात मोठी आव्हानात्मक गोष्ट होती. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून ती जलद गतीने बरी होत आहे. हे प्रकरण वैद्यकीय इतिहासात नोंदवले जाईल. पालकांनी आपल्या मुलांच्या सवयींकडे वेळेवर आणि गंभीरपणे लक्ष द्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
आणखी वाचा