एक्स्प्लोर

राज्यातील 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तेजस्वी सातपुतेंना नवी जबाबदारी, पुण्यात 3 नवे IPS

राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तब्बल 51 IPS अधिकार्‍यांना काहींना प्रमोशन तर काहींचे डिमोशन करुन बदली करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यात आएएस आणि आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या (Transfer) होत असून आता तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, पुणे, मुंबई (Mumbai), नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये, पुण्यातील शस्त्र निरीक्षक शाखा पोलीस अधीक्षकपदी असलेल्या तेजस्वी सातपुते यांची समादेशकपदी बदली करण्यात आली आहे. पुणे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पदावर त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर, महेंद्र पंडित यांची स्तंभ 2 मधून स्तंभ 3 मध्ये नमूद पदावर बदली करण्यात आली आहे. त्यानुसार, महेंद्र पंडित यांना बृह्न्मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.   

राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तब्बल 81 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून 51 IPS अधिकार्‍यांना काहींना प्रमोशन तर काहींचे डिमोशन करुन बदली करण्यात आली आहे. पुण्यातील परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे बदली करण्यात आली असून वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची देखील बदली करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या बदली आदेशान्वये पुण्यामध्ये तीन नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.  दरम्यान, राज्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर गेल्या आठवड्यात पुन्हा चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांची वर्ध्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे (Sachin Kalantre)  यांची बदली पुण्यातील यशदाचे उपसंचालकपदी करण्यात आली. त्यानंतर, आता 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याआहेत. 

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईत पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, विजय पवार, सुनिल लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांची मुंबईतील पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच मुंबईतील पोलीस उपायुक्त पदावर 5 आयपीएस अधिकाऱ्यांची पदोन्नतीवर नेमणूक करण्यात आली आहे. 

हेही वाचा

दंड घेताय की मनमानी करताय? RTO अधिकाऱ्याकडून दुचाकीस्वारास तब्बल 22 हजार 250 रुपयांचा दंड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केमिकल फॅक्टरीत अणुभट्टी युनिटमध्ये भीषण स्फोटात 10 कामगारांचा मृत्यू, 20 जखमी; कामगार 100 मीटरवर उडून पडले
केमिकल फॅक्टरीत अणुभट्टी युनिटमध्ये भीषण स्फोटात 10 कामगारांचा मृत्यू, 20 जखमी; कामगार 100 मीटरवर उडून पडले
Sanjay Pawar: ज्या निवडणुकीत शिवसेना फुटली, त्याच संजय पवारांचा ठाकरेंच्या शिवसेनेतून उपनेतेपदाचा राजीनामा; जिल्हाप्रमुख निवडीवरून मोठ्या उलथापालथी
ज्या निवडणुकीत शिवसेना फुटली, त्याच संजय पवारांचा ठाकरेंच्या शिवसेनेतून उपनेतेपदाचा राजीनामा; जिल्हाप्रमुख निवडीवरून मोठ्या उलथापालथी
Pankaja Munde Beed Crime: बीडच्या कोचिंग क्लासमधील अत्याचार प्रकरणात संदीप क्षीरसागरांचा राईट हॅन्ड; पंकजा मुंडे म्हणाल्या, एका अल्पवयीन मुलीवर...
बीडच्या कोचिंग क्लासमधील अत्याचार प्रकरणात संदीप क्षीरसागरांचा राईट हॅन्ड; पंकजा मुंडे म्हणाल्या, एका अल्पवयीन मुलीवर...
Raj Thackeray & Uddhav Thackeray: मविआच्या काळातील त्रिभाषेसंदर्भातील जीआरवर ठाण्याच्या माणसाची सही; उद्धव ठाकरेंच्या बचावासाठी राज ठाकरे ढाल बनले?
मविआच्या काळातील त्रिभाषेसंदर्भातील जीआरवर ठाण्याच्या माणसाची सही; उद्धव ठाकरेंच्या बचावासाठी राज ठाकरे ढाल बनले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde : बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या...?
Raj Thackeray Full PC : राऊतांचा फोन, राज ठाकरेंचा होकार! ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणजे येणार
Uddhav Thackeray Full PC :  मार्क पडले 100 कमळी आमची एक नंबर, विधानभवनात येऊन भाजपला डिवचलं
Shefali Jariwala Death | शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ कायम, फ्रिजमधील अन्नामुळे बेशुद्धी?
Aaditya Thackeray सरकारच्या सक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकली, 2 भाऊ एकत्र येण्याची भाजपला धास्ती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केमिकल फॅक्टरीत अणुभट्टी युनिटमध्ये भीषण स्फोटात 10 कामगारांचा मृत्यू, 20 जखमी; कामगार 100 मीटरवर उडून पडले
केमिकल फॅक्टरीत अणुभट्टी युनिटमध्ये भीषण स्फोटात 10 कामगारांचा मृत्यू, 20 जखमी; कामगार 100 मीटरवर उडून पडले
Sanjay Pawar: ज्या निवडणुकीत शिवसेना फुटली, त्याच संजय पवारांचा ठाकरेंच्या शिवसेनेतून उपनेतेपदाचा राजीनामा; जिल्हाप्रमुख निवडीवरून मोठ्या उलथापालथी
ज्या निवडणुकीत शिवसेना फुटली, त्याच संजय पवारांचा ठाकरेंच्या शिवसेनेतून उपनेतेपदाचा राजीनामा; जिल्हाप्रमुख निवडीवरून मोठ्या उलथापालथी
Pankaja Munde Beed Crime: बीडच्या कोचिंग क्लासमधील अत्याचार प्रकरणात संदीप क्षीरसागरांचा राईट हॅन्ड; पंकजा मुंडे म्हणाल्या, एका अल्पवयीन मुलीवर...
बीडच्या कोचिंग क्लासमधील अत्याचार प्रकरणात संदीप क्षीरसागरांचा राईट हॅन्ड; पंकजा मुंडे म्हणाल्या, एका अल्पवयीन मुलीवर...
Raj Thackeray & Uddhav Thackeray: मविआच्या काळातील त्रिभाषेसंदर्भातील जीआरवर ठाण्याच्या माणसाची सही; उद्धव ठाकरेंच्या बचावासाठी राज ठाकरे ढाल बनले?
मविआच्या काळातील त्रिभाषेसंदर्भातील जीआरवर ठाण्याच्या माणसाची सही; उद्धव ठाकरेंच्या बचावासाठी राज ठाकरे ढाल बनले?
Uddhav Thackeray: नरेंद्र जाधवांच्या समितीवरून मराठी मनात संशयाचा धूर; उद्धव ठाकरेही म्हणाले, शिक्षण समितीवर अर्थतज्ज्ञ बसवला, असली थट्टा करू नये
नरेंद्र जाधवांच्या समितीवरून मराठी मनात संशयाचा धूर; उद्धव ठाकरेही म्हणाले, शिक्षण समितीवर अर्थतज्ज्ञ बसवला, असली थट्टा करू नये
Sudhakar Badgujar on Apoorva Hiray: बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध अन् अपूर्व हिरेंच्या एन्ट्रीचं स्वागत; आता सुधाकर बडगुजरांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध अन् अपूर्व हिरेंच्या एन्ट्रीचं स्वागत; आता सुधाकर बडगुजरांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
Raj Thackeray: मराठी माणूस एकटवला तर काय होतं सरकारला कळालं, आमचा मोर्चा निघाला असता तर... राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन
मराठी माणूस एकटवला तर काय होतं सरकारला कळालं, आमचा मोर्चा निघाला असता तर... राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन
Kolhapur Shiv Sena: आदित्य ठाकरेंचं बोलणं जिव्हारी लागलं, कोल्हापूरमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने थेट राजीनामा टाकला
आदित्य ठाकरेंचं बोलणं जिव्हारी लागलं, कोल्हापूरमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने थेट राजीनामा टाकला
Embed widget
OSZAR »