राज्यभरात पावसाचा धुमाकुळ, अरबी समुद्र उसळला, तळकोकणात पावसाचा जोर कायम, पुणे, कोल्हापूरात काय स्थिती?
कोकण रेल्वेला पावसाचा मोठा फटका बसला होता. काल वेरवली - विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती

Weather Update: राज्यभरात पावसाचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे .राज्यात पूर्व मान्सून ने थैमान घातल्या असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झालीय . सकल भागात पाणीच पाणी साठले असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे . कोकण रेल्वेच्या अडवली भागात काल पावसामुळे दरड कोसळल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला . रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू केले होते. आजही कोकण विभागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झालाय . तळ कोकणात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या 24 तासात सरासरी 96.5 मी मी पावसाची नोंद झाली आहे .आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय .समुद्रात मच्छीमारांनी मासेमारीसाठी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे . (Rain Update)
कोकण रेल्वेला पावसाचा मोठा फटका बसला होता. काल वेरवली - विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस कणकवली स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या तर नेत्रावती एक्स्प्रेसला संबंधित स्थानकात थांबा देण्यात आला होता. अथक प्रयत्नांनंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही दरड बाजूला करण्यात यंत्रणेला यश आले. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अन्य अनेक गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला हाेता. सुमारे अडीच तासांनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात यंत्रणेला यश आले.
तळकोकणासह उत्तर गोव्यात प्रचंड पाऊस
पुणे, कोल्हापूर, सातारा सांगलीसह राज्याच्या अनेक भागात आज तुफान पाऊस आहे .पावसामुळे पुण्यातील पद्मावती परिसरातील संरक्षण भिंत कोसळली आहे . तळकोकणात साधारणपणे सकाळी 11 नंतर गोव्याला हा पाऊस सुरू झाला आणि संपूर्ण गोव्याला या पावसाला अक्षरशः झोडपून काढलं. मान्सूनपूर्व पाऊस सुरूय . कोणतीही जीवितहानी नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . कोकणासह उत्तर गोव्यात पावसाचा प्रचंड फटका नागरिकांना बसलाय. बाजारपेठांमध्ये पाणी शिरले आहे .पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई हवामान विभागाने (IMD) राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने स्थानिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने किनाऱ्या लगत असलेल्या मच्छीमारांना सतर्कतेचा तसेच समुद्रात न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी नौका पुढील दोन दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आव्हान देखील करण्यात आले आहे. तर या कालावधीत 35 ते 55 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. या अनुषगाने खाडी क्षेत्रात किंवा समुद्रात मासेमारीस जाऊ नये. वादळीवारे सह पाऊसाचे हवामान योग्य होईपर्यंत जिल्हातील कोणत्याही नौका वादळी हवामानाच्या या कालावधीत समुद्रात जाणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्यात यावी. नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावी. अशा सूचना मच्छीमारांना देण्यात आल्या आहेत.
पुणे, कोल्हापूरात पावसाची तुफान बॅटींग
पुण्यासह कोल्हापुरात जोरदार पावसाची बॅटींग सुरु आहे. पावसाने जागोजाग पाणी साचले असून नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. संपूर्ण राज्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची हजेरी लागत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ग्रामीण भागात घरांचे पत्रे उडाले आहेत. झाडे उन्मळून पडली असून सुरक्षा भिंतीही खचल्या आहेत. काल रात्री उशिरा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याने आपल्या जनावरांसाठी लावलेला चारा पीक हे पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे...
हेही वाचा:
Pune Wall Collapsed : पदमावती परिसरातील संरक्षण भिंत कोसळली,सोसायटीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
