मोठी बातमी : सतेज पाटील यांना मोठा धक्का, खंद्या समर्थकाने साथ सोडली, दुसरा पक्ष निवडला!

Satej Patil : काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसलाय.

Continues below advertisement

Satej Patil : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर  (Kolhapur)  महानगरपालिकेतील काँग्रेसचे काही माजी नगरसेवक भाजप आणि शिंदे गटांमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली. आमदार सतेज पाटील (Satej Patil) देखील या बैठकीला उपस्थित होते. यावेळी 34 माजी नगरसेवकांनी हजेरी लावत आपण काँग्रेस सोबतच राहणार असल्याचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. 

Continues below advertisement

शारंगधर देशमुख लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार 

एकीकडे 34 माजी नगरसेवकांनी सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं असताना खंदा समर्थक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे. महानगरपालिकेतील काँग्रेसचे नेते माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख (Sharangdhar Deshmukh) यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. शारंगधर देशमुख हे काही दिवसातच शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार असल्याच बोललं जातंय. मी सतेज पाटलांना सोडलंय, असं शारंगधर देशमुख (Sharangdhar Deshmukh) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे सतेज पाटलांना मोठा धक्का मानला जातोय. शारंगधर देशमुख लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा झटका 

6 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) महायुतीला राज्यात मोठं यश मिळालं. महायुतीच्या यशासाठी कोल्हापूर जिल्ह्याने भरभरुन साथ दिली. कोल्हापुरातील विधानसभेच्या 10 पैकी 10 जागा महायुतीने जिंकल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीला कोल्हापुरात मोठा झटका बसला होता. दरम्यान, आता महाविकास आघाडीकडे सत्ता नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची कामं अडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये असंख्य नेत्यांनी महाविकास आघाडीला रामराम करत महायुतीतील पक्षामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने 5 दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घ्या, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बडे नेते आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील काळात आणखी कोणते नेते महायुतीत प्रवेश करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Narhari Zirwal : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांची प्रकृती बिघडली; मुंबईतील सेफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »