काँग्रेसच्या लोकांचे विचार पाकिस्तानने हायजॅक केले आहेत; पाकव्याप्त काश्मीर आपल्याला धोका नाही, तर पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका : सीएम देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis in Kolhapur : सीएम फडणवीस म्हणाले की, पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात ड्रोन पाठवले. मात्र, त्यांचा एकही ड्रोन हल्ला करू शकला नाही. आपल्या सैन्यांनी ते नेस्तनाबूत करून टाकलं.

CM Devendra Fadnavis in Kolhapur : भारताकडे वाईट नजरेने बघणाऱ्या जशास तसे उत्तर दिलं जाईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं. आज माझ्या माता भगिनी या सभेला सिंदूर लावून आल्या आहेत. मात्र, याचा बदला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. मसूद अहमद, सईद यांच्या परिवारासोबत 100 आतंकवाद्यांना पंतप्रधान मोदींमुळे कंठस्थान घालण्यात यश आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीमध्ये बोलताना केले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण पार पडले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
पाकिस्तानने गुडघे टेकल्यानंतर आपण युद्धविराम केला
फडणवीस म्हणाले की, पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात ड्रोन पाठवले. मात्र, त्यांचा एकही ड्रोन हल्ला करू शकला नाही. आपल्या सैन्यांनी ते नेस्तनाबूत करून टाकलं. पाकिस्तानकडे अशा प्रकारचे शस्त्रचं नाही जे भारताच्या भूमीला टच करू शकेल.पाकिस्तानने गुडघे टेकल्यानंतर आपण युद्धविराम केला, आम्ही पाकिस्तानी नागरिकांवर कोणताही हल्ला केला नाही. त्यांनी सांगितले की, या युद्धातील सर्वात मोठी उपलब्धी सर्व युद्ध साहित्य मेड इन इंडिया आहे. एक राहुल ( आमदार राहुल आवाडे) अडीच किलोमीटर तिरंगा यात्रा काढतो तर दुसरा राहुल (राहुल गांधी) विमान कशी पडली, हल्ले कसे झाले असे विचारतो. पाकव्याप्त काश्मीर आपल्याला धोका नाही तर पाक काबुत काँग्रेस देशाला धोका असल्याची टीका त्यांनी केली. ज्यांच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस घुसला आहे त्यांना समजावेल कोण? ऑपरेशन तिरंगाच्या माध्यमातून नवीन भारत जगाने पाहिल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसच्या लोकांचे विचार पाकिस्तानने हायजॅक केले
काँग्रेसच्या लोकांचे विचार हे पाकिस्तानने हायजॅक केले आहेत. या मूर्खांना माहीत नाही शेतीचे ड्रोन आणि युद्धाचे ड्रोन वेगळ्या असतात या मूर्खांना आता कोण समजावणार. काँग्रेसच्या डोक्यात पाकिस्तानचा वायरस दुसरा आहे आणि त्यांचा हार्ड डिस्क करप्ट केला आहे. हा नवा भारत आहे आमच्या बायकांचा सिंदूर पुसलं तर आम्ही घुसून मारू असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोनशिलेचे अनावरण झाले, तसेच त्यांनी नूतन इमारतीची पाहणी केली. उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
