Mayuri Jagtap Zero Hour : माझ्याकडे चांदीची गौराई मागितली होती,आईने गूगल पेनं पैसेही पाठवले
Mayuri Jagtap Zero Hour : माझ्याकडे चांदीची गौराई मागितली होती,आईने गूगल पेनं पैसही पाठवले
Vaishnavi Hagawane Death : पती घरी नसताना पण दीर, सासू, सासरा आणि नणंद या चौघांकडून बेदमपणे मारहाण केली जात होती. आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे, त्यांनीच माहेरी आणून सोडल्याने मी जिवंत राहिलो. त्यांच्या कुटुंबातील (हगवणे) कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव त्यांना (पती) सुद्धा होती, अशा शब्दांमध्ये हागवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप यांनी सनसनाटी खुलासा आणि गंभीर आरोप केले आहेत. सासरा, सासू नणंद आणि दीरांकडून भयंकर पद्धतीने माझ्यासह वैष्णवीला सुद्धा त्रास दिला जात होता, असे त्यांनी सांगितले.
वैष्णवीला घरामध्ये मारहाण केली जात होती हे कर्मचाऱ्यांकडून समजलं
या सर्व वादाशी मूळ कारण नणंद करिष्मा असल्याचेही मयुरी जगताप यांनी सांगितलं. पतीपासून वेगळे करण्याचा प्रयत्नही कुटुंबीयांकडून झाल्याचे मयूर जगताप म्हणाल्या. वैष्णवीला घरामध्ये मारहाण केली जात होती हे कर्मचाऱ्यांकडून समजलं. सासरे, दीर, नणंद, सासूकडून मारहाण होत होती असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा मोबाईलमध्ये सर्व रेकॉर्ड केलं होत आणि तो मोबाईल रेकॉर्ड काढून घेण्यासाठी शशांकने सुद्धा उचलून आपटल्याचे मयुरी म्हणाल्या. माझा फोन काढून घेण्यात आला होता. वैष्णवी सासरच्यांना घाबरत होती असे त्यांनी सांगितलं इतकेच नव्हे तर कुटुंबीयांकडून माझा नवऱ्याला सुद्धा शशांकडूनही त्रास दिल्याचे त्यांनी सांगितलंं.
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
