ट्रेंडिंग
Pakistan Cosmatic Jihaad: पाकिस्तानचा 'कॉस्मेटिक जिहाद'; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद, ऑनलाइन शॉपिंगद्वारे भारतात धोकादायक वस्तूंचा पुरवठा
Pakistan Cosmatic Jihaad: ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 'मेड इन पाकिस्तान' उत्पादने मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानशी कोणताही व्यापार सुरू नाही.
Pakistan Cosmatic Jihaad: ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानशी सर्व व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा केली होती, परंतु आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. भाजप नेते आणि उद्योगपती निलोप्तल मृणाल यांनी तक्रार केली की, पाकिस्तानातून वस्तू अजूनही ऑनलाइन शॉपिंग साइट्सद्वारे भारतात पोहोचत आहेत. त्यांनी याला 'कॉस्मेटिक जिहाद' असं म्हटलं आहे. हे साहित्य धोकादायक असू शकते आणि त्याद्वारे दहशतवादाला आर्थिक पाठबळ दिले जात आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
निलोप्तल मृणाल यांनी एका ऑनलाइन साईटवरून पाकिस्तानी वस्तू ऑर्डर करून लाईव्ह डेमो दाखवला आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध बंद असले तरी काही लोक अजूनही पाकिस्तानमधून वस्तू मागवत आहेत हे त्यांनी दाखवले आहे. त्यांच्या मते, या वस्तू, विशेषतः कॉस्मेटिक उत्पादने आहेत जे अत्यंत धोकादायक असू शकतात.
अॅसिडसारख्या गोष्टींची भीती
यामध्ये अॅसिडसारखे हानिकारक पदार्थ मिसळले जाऊ शकतात आणि पाठवले जाऊ शकतात, ज्यामुळे लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते, अशी भीती मृणाल यांनी व्यक्त केली आहे. भारताने अलिकडेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
ऑनलाइन शॉपिंगद्वारे पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तू
मृणाल यांनी सांगितले की, ऑनलाइन शॉपिंगद्वारे पाकिस्तानला जाणारा पैसा दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यांनी लाईव्ह डेमोमध्ये ऑर्डर प्रक्रिया दाखवली आणि भारतात माल किती सहज पोहोचत आहे हे स्पष्ट केले आहे. या डेमोनंतर, त्यांनी ऑर्डर केलेल्या वस्तू पुरावा म्हणून ठेवल्या आणि त्याबद्दल पोलिस आणि इतर तपास संस्थांकडे तक्रार केली आहे.
कडक कारवाईची मागणी
या प्रकरणी कडक कारवाईची मागणी भाजप नेत्याने केली आहे. त्यांनी सांगितले की, सरकारने ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचलावीत.ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तान भारताला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याने ही घटना राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हरियाणामध्ये आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली तेव्हा हे प्रकरण अधिक गंभीर होते. अशा परिस्थितीत, ऑनलाइन शॉपिंगद्वारे धोकादायक वस्तूंचा पुरवठा थांबवणे खूप महत्वाचे झाले आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील सर्व व्यापार सध्या बंद असताना देखील ऑनलाइन साईटवर पाकिस्तानमधून अजूनही वस्तू भारतात येत आहेत. पाकिस्तानमधून येणारे सामान खूप धोकादायक असल्याचे ऑनलाइन उघड झाले आहे. भारताने पाकिस्तानमधून आयात-निर्यात थांबवली आहे, पण पाकिस्तानी उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर विकली जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानी उत्पादने कोणत्याही परवानगीशिवाय, जीएसटी न भरता आणि कोणत्याही मानकांशिवाय विकली जात आहेत.
भाजप नेते आणि व्यवसायाने व्यापारी निलोप्तल मृणाल यांनी पाकिस्तानमधून ऑनलाइन कॉस्मेटिक उत्पादने ऑर्डर केली आणि ते उत्पादन ३ दिवसांत त्यांच्या घरी पोहोचले. भारतातील लोक अजूनही पाकिस्तानमधून वस्तू कशा मागवत आहेत हे निलोप्तल मृणाल यांनी लाईव्ह डेमोमध्ये दाखवले. पाकिस्तानातून येणारा माल खूप धोकादायक असू शकतो. पाकिस्तान सौंदर्यप्रसाधनांमध्ये अॅसिडसारख्या गोष्टी मिसळून ते पाठवू शकतात. पाकिस्तान ऑनलाइन शॉपिंगमधून मिळणाऱ्या पैशातून दहशतवाद्यांना मदत करतो, हा एक प्रकारचा कॉस्मेटिक जिहाद आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.