ट्रेंडिंग
एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, भरधाव बसने चौघांना उडवले; 2 ठार 2 गंभीर जखमी
एसटी बसचा ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकी स्वारांसह 4 जणांना चिरडले आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जळगाव : जिल्ह्यातील चोपडा शहरात स्वस्तिक टॉकीज परीसरात भीषण अपघाताची (Accident) घटना घडली असून दुर्घटनेत 2 जण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी आहेत. येथे महामंडळाच्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताच्या (Jalgaon) घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर, जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
एसटी बसचा ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकी स्वारांसह 4 जणांना चिरडले आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रवींद्र बहारे (वय 40 वर्ष) व सोनू रशीद पठाण (वय 22 वर्ष) अशी अपघातातील मृतांची नावे असून तर अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर स्थानिकांसह आमदार चंद्रकांत सोनवणे यांनीही देखील घटनास्थळी भेट दिली.