Operation Sindoor: मसूद अझहर अन् जैशशी संबंध, भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईकसाठी बहावलपूरचीच निवड का केली?
Operation Sindoor: भारतीय सेनेनं तब्बल नऊ दहशतवादी स्थळांवर लक्ष्य साधलं, यामध्ये जन्श-ए-मोहम्मदचं हेडक्वॉर्टसही (Jansh-e-Mohammadchan Headquarters) उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. पण, भारतीय लष्करानं बदला घेण्यासाठी पाकिस्तानचं बहावलपूरच का निवडलं?

Operation Sindoor: भारतीय सैन्य दलानं पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) मृत्यूमुखी पडलेल्या 26 जणांच्या मृ्त्यूचा बदला घेतला. भारतीय सेनेनं (Indian Army) पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मिरमधील (Pakistan-Occupied Kashmir) दहशतवाद्यांचे तब्बल नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त केले असून 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) फत्ते केलं आहे.
भारतीय सेनेनं तब्बल नऊ दहशतवादी स्थळांवर लक्ष्य साधलं, यामध्ये जन्श-ए-मोहम्मदचं हेडक्वॉर्टसही (Jansh-e-Mohammadchan Headquarters) उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं आहे. पण, भारतीय सैन्याच्या टार्गेटवर पाकिस्तानचं बहावलपूरवरच (Bahawalpur) का आलं? (Why Indian Army Choose Bahawalpur?) जाणून घेऊयात सविस्तर...
भारतीय सशस्त्र दलांनी रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाईत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगचे डीजी आयएसपीआर यांनी कोटली, मुरीदके आणि बहावलपूरसह नऊ ठिकाणी भारतीय हल्ल्यांची पुष्टी केली आहे. याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं आहे. ज्याचं मुख्य लक्ष्य जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तैयबा सारखे जिहादी अड्डे होते, जे गेल्या तीन दशकांपासून भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत.
भारताचं लक्ष्य फक्त बहावलपूरच का होतं?
पाकिस्तानातील बारावं सर्वात मोठं शहर बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला. हे शहर लाहोरपासून सुमारे 400 किमी अंतरावर आहे आणि जैशचं मुख्यालय 'जामिया मस्जिद सुभान अल्लाह' परिसरात आहे, ज्याला उस्मान-ओ-अली कॅम्पस असंही म्हणतात. हा परिसर 18 एकरांवर पसरलेला आहे आणि ते JeM साठी भरती, निधी आणि प्रशिक्षणाचं केंद्र आहे. भारतीय हल्ल्यात इथली मशीद देखील लक्ष्य होती. जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मौलाना मसूद अझहर हा बहावलपूरचा रहिवासी आहे आणि याच ठिकाणी कडेकोट सुरक्षा असलेल्या परिसरात राहतो.
Summary on the list of 9 targets taken by the Indian Armed Forces under #OperationSindoor in Pakistan, PoK
— ANI (@ANI) May 7, 2025
1. Markaz Subhan Allah Bahawalpur
2. Markaz Taiba, Muridke
3. Sarjal / Tehra Kalan
4. Mehmoona Joya Facility, Sialkot,
5. Markaz Ahle Hadith Barnala, Bhimber,
6. Markaz… pic.twitter.com/vycQ7LGwt5
2002 मध्ये जैश-ए-मोहम्मद (जेईएम) वर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली होती, पण ती कारवाई केवळ कागदावरच मर्यादित राहिली. जेईएमला त्यांचे कॅम्प चालवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेलं. जैश-ए-मोहम्मदचा हा तळ पाकिस्तानच्या 31 व्या कॉर्प्सच्या मुख्यालयापासून थोड्या अंतरावर आहे. एक लष्करी छावणी आहे. बहावलपूरमध्ये एक सीक्रेट न्यूक्लिअर फॅसिलिटीचं ठिकाणंही आहे. या कॅम्पजवळ असलेली छावणीची उपस्थिती ही आयएसआयकडून जैश-ए-मोहम्मदला मिळत असलेल्या पाठिंब्याचा आणि संरक्षणाचा सर्वात मोठा पुरावा आहे.
जामिया मस्जिद सुब्हान अल्लाह ही मशीद, एका मदरशाच्या रुपात समोर येते, ही जैश-ए-मोहम्मदची आघाडीची संघटना अल-रहमत ट्रस्टकडून निधी पुरवत होती. 2011 पर्यंत ती एक साधी इमारत होती, पण 2012 पर्यंत ती एका मोठ्या प्रशिक्षण केंद्रात रूपांतरित झाली. सॅटेलाईट इमेजवरुन असं दिसतं की, हा परिसर 18 एकरांवर पसरलेला आहे, ज्यामध्ये एक मोठी मशीद, 600 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी एक मदरसा, एक स्विमिंग पूल, घोड्यांसाठी तबेले आणि एक व्यायामशाळा यांचा समावेश आहे.
जैश-ए-मोहम्मदचा इतिहास
24 डिसेंबर 1999 रोजी, हरकत-उल-मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांनी 190 प्रवासी आणि क्रू मेंबर्सना घेऊन जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण केलेलं. हे विमान काठमांडूहून दिल्लीला आणलं जात होतं, पण ते अमृतसर, लाहोर, दुबई मार्गे कंधार (तालिबान-व्याप्त अफगाणिस्तान) इथे नेण्यात आलं. भारताला मसूद अझहर, उमर शेख आणि मुश्ताक जरगर या तीन दहशतवाद्यांना सोडण्यास भाग पाडलं गेलं.
मसूद अझहर कोण?
पुढे 1968 मध्ये जन्मलेल्या मसूद अझहरला 1994 मध्ये भारतात अटक करण्यात आली. अटकेपूर्वी तो अफगाणिस्तानस्थित दहशतवादी संघटना हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) चा सदस्य आणि एक मौलवी होता. सुटका झाल्यानंतर मसूद अझहरनं जैश-ए-मोहम्मद (जेईएम) ची स्थापना केली. ही संघटना देवबंदी धर्माच्या कट्टरपंथी इस्लामिक विचारसरणीनं प्रेरित आहे. 2000 नंतर, इतर सक्रीय दहशतवादी संघटनांसह, जैश-ए-मोहम्मदने भारतात अनेक हल्ले केले, ज्यात जम्मू-काश्मीर विधानसभा आणि भारतीय संसदेवरील हल्ले समाविष्ट होते.
जैश-ए-मोहम्मदची सुरुवात 31 जानेवारी 2000 मध्ये कराचीमध्ये झाली. दहशतवादी कारवाया सुरू करण्यापूर्वी, अझहर अफगाणिस्तानात गेला, जिथे तो अल-कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेनला भेटला.
या संघटनेला ISI कडून केवळ पायाभूत सुविधांमध्येच नव्हे, तर निधी आणि परदेश दौऱ्यांमध्येही मदत मिळाली. जैश-ए-मोहम्मदचे पहिले काही सदस्य हरकत-उल-मुजाहिदीनच्या कार्यकर्त्यांमधून आले होते. बहावलपूर येथील मुख्यालयाचा वापर प्रामुख्यानं भरती, निधी उभारणी आणि ब्रेनवॉशिंगसाठी केला जातो, तर दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे खैबर पख्तूनख्वा आणि पीओकेमध्ये आहेत.
'जैश-ए-मोहम्मद'नं भारताविरोधात केलेल्या कुरापती
- एप्रिल 2000: श्रीनगरच्या बडामी बागमध्ये पहिला आत्मघाती हल्ला, चार सैनिक शहीद
- ऑक्टोबर 2001: जम्मू-कश्मीर विधानसभेवर हल्ला, 30 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
- डिसेंबर 2001: संसदेवर हल्ला, 14 लोकांचा मृत्यू
- जानेवारी 2016: पठाणकोट एयरबेस हल्ला, 3 सुरक्षाकर्मी शहीद
- सप्टेंबर 2016: उरी हल्ला, 19 भारतीय सैनिक शहीद
- फेब्रुवारी 2019: पुलवामा हल्ला, 40 CRPF जवान शहीद
- 22 एप्रिल 2025: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात JeM च्या उपसंघटनेचा हात
पाहा व्हिडीओ : भारतीय सैन्याच्या हल्ल्यात 'जैश-ए-मोहम्मद'चं हेडक्वार्टर उद्ध्वस्त
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
