ट्रेंडिंग
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्रा अन् ISI अधिकारी अली हसनचा चॅट तपास यंत्रणेच्या हाती; कटाची माहिती उघड, कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
Jyoti Malhotra : आयएसआय अधिकारी अली हसन याने ज्योतीला कोडवर्डमध्ये अंडरकव्हर एजंट होण्याबाबत विचारणा केल्याची माहिती यामध्ये समोर आली आहे.
मुंबई: हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्योती मल्होत्राचा आयएसआयशी असलेले संबंध आणखी गडद होत चालले आहेत. ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट आता समोर आलं आहे. या व्हॉट्सॲप चॅटमध्ये कटाची संपूर्ण योजना उघड झाली आहे. आयएसआय अधिकारी अली हसन याने ज्योतीला कोडवर्डमध्ये अंडरकव्हर एजंट होण्याबाबत विचारणा केल्याची माहिती यामध्ये समोर आली आहे. ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांचं व्हॉट्सॲप चॅट तपास यत्रंणांच्या हाती लागलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राने वाघा अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता.अली हसन हा पाकिस्तानमधील आयएसआय ऑपरेटरने ज्योतीसोबत व्हॉट्सॲप चॅट केलं आहे. त्यावेळी त्याने पहिलांदा प्रश्न केला होता, तिथून कोण कोण पाकिस्तानमध्ये आले होते, कोणाला काही खास प्रोटोकॉल दिला गेला का? त्यावरून पटकन ज्योतीला हे लक्षात आलं नाही की अली हसन हा तिच्याशी कोडवर्डमध्ये बातचीत करू इच्छित होता. तो ज्योतीकडून भारतातून कोणी गुप्तहेर पाकिस्तानमध्ये जात आहेत का? याविषयीची माहिती तो मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावरती ज्योती मल्होत्राने उत्तर देताना म्हटलंय, मला प्रोटोकॉल मिळाला नाही. इतर कोणाला मिळाला का माहिती नाहीये, त्यावर अली हसनने असं म्हटलं आहे की, कोणी अंडरकव्हर असेल किंवा गुप्तहेर जो त्या देशात जाऊन तेथील माहिती मिळवेल, अशा गुप्तहेरांची माहिती देईल अशा कोणी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे का? याबाबतची माहिती अली हसनने ज्योतीला विचारली आहे.
त्यानंतर ज्योतीला त्याने म्हटलं आहे, तुम्ही त्याला गुरूद्वारामध्ये घेऊन या आणि तुम्ही दोघं तिथ बसा. या चॅटद्वारे अली हसन ज्योतीला कोडवर्डमध्ये कोणाला तरी सोबत आणण्यासाठी सांगत आहे, हे लक्षात येते. भारतातील इंटेलिजन्सने पाकिस्तानधील दहशतवादी अड्ड्यांची माहिती गोळा केली होती. त्याचा परिणाम ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहायला मिळाला, ही माहिती देणाऱ्या गुप्तहेरांवरती पाळत ठेवण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी अली हसन प्रयत्न करत होता, अशी माहिती समोर आली आहे, सध्या ज्योतीची चौकशी सुरू आहे.
पाकिस्तानसह चीनलाही जाऊन आलीय ज्योती मल्होत्रा
हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्यूएन्झर्सशीही संपर्क असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्योतीची यूट्यूबर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशातील पुरीत कसून चौकशी सुरु आहे. कुरूक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली. तर इतर इन्फ्ल्यूएन्झर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरत होते. तसेच पाकिस्तानसह चीनलाही ज्योती मल्होत्रा जाऊन आली आहे.
कोण आहे ज्योती मल्होत्रा?
ज्योती मल्होत्रा ही एक भारतीय युट्यूबर आणि ट्रॅव्हल व्लॉगर आहे, जिला अलीकडेच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तीच्या या कारवायांमुळे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्योतीने आपल्या करिअरची सुरुवात रिसेप्शनिस्ट आणि शिक्षिका म्हणून केली. नंतर तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये प्रवेश केला आणि "Travel with Jo" या युट्यूब चॅनेलवर विविध देशांतील प्रवासाचे व्हिडीओ शेअर करू लागली. तिच्या व्हिडिओंमध्ये पाकिस्तानातील पर्यटन स्थळांची माहिती आणि त्या देशाच्या बाजूने विचार मांडले जात होते. या माध्यमातून तीने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. ज्योतीच्या युट्यूब चॅनेलमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची चौकशी सुरू आहे. अहवालानुसार, तिची एकूण संपत्ती लाखो रुपयांमध्ये असून, ती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय आहे. तिच्या आर्थिक व्यवहारांबद्दल सुरक्षा यंत्रणा सखोल तपास करत आहेत.