Laxman Hake: बोगस ओबीसींना खड्यासारखे दूर ठेवा, लक्ष्मण हाकेंची मागणी; नांदेड ते मुंबई लाँगमार्चही काढणार

Laxman Hake: महायुतीसह महाआघाडीच्या सर्व पक्षांना लक्ष्मण हाकेंनी इशारा देखील दिला आहे.

Continues below advertisement

Laxman Hake: राज्यात जवळपास सव्वा सात लाख कुणबी दाखल्याचे वाटप करण्यात आले असून या बोगस ओबीसींना येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत खड्यासारखे दूर ठेवा, यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके नांदेड ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याचे माझाशी बोलताना सांगितले. या लाँग मार्चमधून ओबीसीची राज्यभरात जनजागृती केली जाणार असून एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे 27 टक्के आरक्षण आबादी ठेवले आहे. मात्र आमच्यासमोर सव्वा आठ लाख बोगस कुणबी दाखल्याचा विषय असून या विरोधात आमचा संघर्ष असणार असल्याचे हाके यांनी सांगितले. या लाँगमार्चमुळे राज्यातील ओबीसीची वज्रमूठ बनवणार असून पंचायत राज निवडणुकीत ही ताकद दाखवली जाईल, असे हाके यांनी सांगितले. 

Continues below advertisement

एका बाजूला आज महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी आज अचानक छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे. आज संदर्भ घेत बोलताना सर्वच राजकीय पक्षांनी जर खऱ्या ओबीसीला उमेदवारी दिली. तर त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमची मात्र या ठिकाणी बोगस ओबीसी दिल्यास त्या पक्षाला त्याची जागा दाखवू आणि हे आम्ही विधानसभेत करून दाखवले आहे, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी महायुतीसह महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना दिला आहे. जर कोणी कोणाची मते जातील म्हणून घाबरत असतील तर त्या पक्षांनी हेही लक्षात ठेवावे. जर ओबीसी एकत्र आला तर काय घडते हे पुन्हा एकदा पंचायतराज निवडणुकीत ओबीसी दाखवून देईल असेही लक्ष्मण हाके म्हणाले. मराठवाडा दौऱ्यावर निघण्यापूर्वी आज सकाळी लक्ष्मण हाके माध्यमांशी बोलत होते. 

संबंधित बातमी:

Laxman Hake On Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच लक्ष्मण हाके म्हणाले, यह तो झाकी है..., आता जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे...

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »