ट्रेंडिंग
बायकोनं विष प्राशन करून आयुष्य संपवताच नवऱ्याचा दोन मुलांसह विषारी बिर्याणी खाऊन संपूर्ण कुटुंबाचा शेवट; मृत्यूची बातमी ऐकून बाप अन् भाऊ सुद्धा आला नाही
परलाखेमुंडी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक प्रशांत भूपती यांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी खाल्लेल्या बिर्याणीचे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर तो नैराश्यात होता.
Tragic family death : दीड महिन्यांपूर्वी पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर नैराश्यात गेलेल्या पतीने पोटच्या दोन मुलांसह विषारी बिर्याणी खाऊन (Husband and Children Die After Eating Poisoned Biryani) संपूर्ण कुटुंबाचा शेवट केल्याची भयावह घटना घडली. शेजाऱ्यांना पती आणि त्याची दोन मुले बेशुद्ध अवस्थेत आढळली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी सांगितले की, मयत व्यक्तीचा त्याच्या वडिलांशी आणि भावाशी मालमत्तेचा वाद होता आणि त्याच्या मृत्यूची बातमी ऐकूनही ते घरी आले नाहीत.
पत्नीची सुद्धा विष प्राशन करून आत्महत्या
ही घटना ओडिशाच्या गजपती जिल्ह्यात घडली. 40 वर्षीय पुरूषाने आणि त्याच्या दोन मुलांनी विषारी बिर्याणी खाऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. जिल्हा मुख्यालय असलेल्या परलाखेमुंडी येथील ओडिया परला स्ट्रीटवर बुधवारी दुपारी ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 मार्च रोजी त्या पुरूषाच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या (Family dies after suicide pact) केली होती.
उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू
विषारी बिर्याणी खाल्ल्यानंतर तो पुरूष आणि त्याची दोन मुले बेशुद्ध अवस्थेत आढळली, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या सात वर्षांच्या मुलाला आणि 11वर्षांच्या मुलीला परलाखेमुंडी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला, तर त्या पुरूषाला आणि त्याच्या मुलीला बेरहमपूर येथील एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, जिथे त्यांनी गुरुवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.
पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यात होता, व्यवसायातही नुकसान
परलाखेमुंडी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक प्रशांत भूपती यांनी सांगितले की, त्यांनी मृत्यूपूर्वी खाल्लेल्या बिर्याणीचे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर तो आधीच नैराश्यात होता आणि अलीकडेच व्यवसायात नुकसान झाले होते, असे त्यांनी सांगितले. मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या